"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?
By देवेंद्र जाधव | Updated: February 12, 2025 17:35 IST2025-02-12T17:34:46+5:302025-02-12T17:35:42+5:30
'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला छत्रपती शंभूराजेंच्या रुपात विकी कौशलला पाहून सुव्रत जोशीला काय वाटलं? काय म्हणाला बघा (suvrat joshi, chhaava)

"कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका..."; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?
सुव्रत जोशी 'छावा'(chhaava movie) सिनेमात एका खास भूमिकेत दिसणार आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सुव्रतने हा खुलासा केला होता. सुव्रत नेमकी कोणती भूमिका साकारतोय हे याचा खुलासा अद्याप झाला नाही. दरम्यान 'छावा'च्या सेटवर सुव्रतने आलेला अनुभव दिलखुलासपणे सांगितला. इतकंच नव्हे तर विकी कौशलला (vicky kaushal) पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यावर सुव्रतला (suvrat joshi) काय वाटलं, याविषयी त्याने खुलासा केला
विकीला छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यावर सुव्रतला काय वाटलं?
विकी कौशलला पहिल्यांदा शंभूराजेंच्या भूमिकेत पाहून सुव्रत म्हणाला की, "विकीला जबाबदारीची पूर्ण जाणीव होती की तो कोणती भूमिका करतोय. त्यासाठी त्याने तयारी प्रचंड केली होती. तो उंचपुरा आहे त्यात त्याने अंगमेहनत घेतली होती. विकीला जबाबदारीची जाणीव असल्याने तो नट म्हणून अतिशय सहृदयी आहे. तो प्रत्येक प्रसंग चांगला व्हावा यासाठी संपूर्ण मेहनत घेऊन काम करत होता. प्रत्येक प्रसंगाची व्यवस्थित रिहर्सल व्हायची. तो प्रत्येकाच्या वेळी क्यू द्यायला थांबायचा. कॅमेरामध्ये कधीकधी सहाय्यक दिग्दर्शक वगैरे वाक्य घ्यायला येतात. पण विकीने तसं अजिबात केलं नाही."
"डोळ्यात डोळे घालून संवाद बोलल्याने तो चांगला शूट होतो. कदाचित छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तो अक्षरश: जगत होता. आठ - नऊ नट एका फ्रेममध्ये असले तरी तो प्रत्येकाच्या वेळी क्यू देत होता, ही सुखावणारी गोष्ट आहे. आम्ही नाटकात जसं काम करतो, किंवा मराठी चित्रपटांमध्ये सगळे नट मेहनत घेऊन काम करतात. कोणीही छोटा , कोणीही मोठा असा भेदभाव नसतो. तसाच तो सेट होता." 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होतोय.