इंटरेस्टींग आहे आयुशी भावेची सुयश टिळकसोबत प्यारवाली Love Story, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 08:00 IST2021-07-11T08:00:00+5:302021-07-11T08:00:00+5:30
आयुशी भावेसोबत साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी खुद्द सुयशनेच चाहत्यांना दिली होती.साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

इंटरेस्टींग आहे आयुशी भावेची सुयश टिळकसोबत प्यारवाली Love Story, जाणून घ्या
अभिनेता सुयश टिळकने साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत चाहत्यांनाही सुखद धक्का दिला होता.आयुशी भावेसोबत साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी खुद्द सुयशनेच चाहत्यांना दिली होती.साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दुसरीकेड आयुशी आहे तरी कोण ? दोघांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली याविषयीही अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते.
कारण दोघांनी यापूर्वी कधीच त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली नव्हती. त्यांच्या नात्याविषयी मौनच बाळगणे पसंत केले होते. सुयशने त्याच्या या प्रेमाची कमालीची गुप्तता पाळली होती. पण योग्य वेळ येताच त्याच्या प्रेमाचाही गोड खुलासा करत चाहत्यांनाही सरप्राईज दिले.
याविषयी सुयशने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. इतकेच काय तर दोघांच्याही आवडी - निवडी सारख्याच आहेत. पुण्याच्याच घरी कमी पाहुणे मंडळींच्या उपस्थित आमचा साखरपुडा पार पडला.
चाहतेही दोघांचा लूक पाहून संभ्रमात पडले होते. यावरही त्याने सांगितले की, आयुशी आणि मला दोघांनाही दाक्षिणात्य संस्कृती फार आवडते. त्यामुळे याच थीमनुसार आम्ही साखरपुडा करायचे ठरवले होते. दोघांचा लूकही तसाच होता. नुकताच साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही. वर्षाअखेरील लग्न करणार असल्याचे सुयशने म्हटले आहे.
सुयश त्याच्या पहिल्या ब्रेकअमुळेही जास्त चर्चेत होता. ब्रेकअप आधी दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसह फोटो शेअर करत प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली देताना दिसायचे. दोघांचेही एकत्र फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्यातल्या प्रेमाचा अंदाज आलाच होता. पण अचानक ब्रेकअप झाल्याचे कळताच दोघांच्याही चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
विशेष म्हणजे दोघेही तितकेच लोकप्रिय होते. दोघांनीह लग्न करावे अशीच चाहत्यांचीसुद्धा ईच्छा होती. दोघेही तितकेच चाहत्यांचे आवडते होते. ब्रेकअपनंतर मात्र अनेकांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जास्त चर्चा केल्या. मुळात तेव्हाही चांगली मैत्री होती आणि आत्ताही आहे.आयुशीला माझ्या भूतकाळाविषयी सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. मुळात ती खूपच समजूतदार आहे. मला समजून घेणारी लाईफ पार्टनर मिळाली मी त्यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.