“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:36 IST2023-04-12T16:27:03+5:302023-04-12T16:36:39+5:30
दोघांच्या नात्यात नेमकं का बिनसलं?, यावर सुयश टिळकनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही...
कलाकारांच्या अफेअर, रिलेशनशीपबाबत जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना कायम असते. काही कलाकार आपलं नातं उघडपणे स्वीकारतात आणि त्यावर बिनधास्त बोलतात. तर काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलणं टाळतात. असंच काहीसं सुयश टिळक व अक्षया देवधरच्या बाबतीत घडलं. काही वर्षांपूर्वी सुयश व अक्षया एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र आता दोघांचेही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न होऊन ते आपआपल्या आयुष्यात पुढे गेले आहे. पण दोघांच्या नात्यात नेमकं का बिनसलं?, यावर सुयशनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
अलिकडेच सुयश 'प्लॅनेट मराठी’च्या ‘त्या नंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात आला होता. यावेळी त्याला अक्षयासोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. अक्षयाबरोबर तुझं नातं संपल्यानंतर काही बदललं का? या प्रश्नावर त्याने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. ऐवढंच नाही तर दोघांचं ब्रेकअप नेमकं का झालं?, यावर सुद्धा तो बोलला.
सुयश म्हणाला, ''अक्षयाच्या आधी ही मी एक अनुभव असा घेतला होता. त्यामुळे माझ्याबरोबर हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. पण अक्षयासोबत माझं खूप चांगलं नातं होतं. आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेत होतो आमच्या चांगली मैत्री होती. तिच्या आयुष्यात आणखी कुणीतरी आलं हे जेव्हा तिला जाणवलं तेव्हा तिने मला मैत्रीच्या नात्यानं सांगितलं. मी तिच्या निर्णयाचा आदर करत पुढं निघून गेलो.''
पुढे सुयश म्हणाला, आजही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. आम्ही एकमेकांना समोर बघू शकत नाही किंवा एकमेकांशी बोलू शकत नाही असं काहीच नाही”
सुयशच्या आयुष्यात आयुषीची एन्ट्री झाली ती 2018 साली. . सुयश व आयुषीने ऑक्टोबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचा सुखी संसार सुरु आहे.