मुंबईत रंगणार ‘स्वरांजली’ संगीत महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 04:31 AM2018-01-03T04:31:28+5:302018-01-03T10:01:28+5:30
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम कलाकार बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद राशीद खान, पंडित उल्हास कशाळकर, उस्ताद शाहिद परवेज, श्रीमती ...
lass="m_1156370289727970134m_2962706918977148042m_-3584722847723357116m_7868330886435531524m_5993752092639615056m_-1010893083294701219m_646829914881599195m_7895452910413884038m_3127815819791895831m_1843610936139685339m_-4961353082611574594m_-4188051715930554363gmail-MsoNoSpacing" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम कलाकार बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद राशीद खान, पंडित उल्हास कशाळकर, उस्ताद शाहिद परवेज, श्रीमती अश्विनी भिडे-देशपांडे आणि श्रीमती कौशिकी चक्रबर्ती भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सव ‘स्वरांजली’मध्ये सहभागी होत आहेत. हा महोत्सव ४ ते ६ जानेवारी २०१८ दरम्यान वरळी येथील नेहरू केंद्रात दररोज रात्री ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
वार्षिक भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सव ‘स्वरांजली’ हा वरळी येथील नेहरू केंद्रात ४ ते ६ जानेवारी २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. नावावरून ध्वनित होते त्यानुसार ‘स्वरांजली’ ही श्रद्धांजली किंवा स्वरांचा उत्सव आहे. या महोत्सवाला २००२ मध्ये सुरुवात झाली ती पंडित दिवंगत सुरेश हळदणकर, पंडित दिवंगत जितेंद्र अभिषेकी आणि दिवंगत पंडित पद्मभूषण सी आर व्यास या स्वरतपस्वींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्दिष्टाने. या तीन गुरूंनी पंडित प्रभाकर कारेकर यांच्या शास्त्रीय संगीत प्रवासात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आणि ज्ञानात भर घातली.
गुरुवारी ४ जानेवारी २०१८ रोजी पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे. या गायकीच्या त्या एक आघाडीच्या गायिका आहेतच पण त्याचबरोबर त्या उच्चशिक्षितही आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट मिळविली आहे. संगीताचा वारसा असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या शिरपेचात अनेक तुरे खोवले गले आहेत. त्यांत संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराचाही समावेश आहे. पहिल्या दिवसाची सांगता अत्यंत प्रतिभावान आणि आज सर्वाधिक मागणी असलेले गायक उस्ताद राशीद खान यांच्या गायनाने होणार आहे. उस्ताद राशीद खान हे त्यांच्या भावना अत्यंत सुंदर पद्धतीने व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हृदयस्पर्शी आवाजाने ते स्वसंवाद साधतात. त्यांच्या नावावर कित्येक अल्बमची नोंद आहेत. तसेच अनेक गाजलेल्या कार्यक्रमांच्या रेकॉर्डिंगही त्यांनी केल्या आहेत.
शुक्रवारी ५ जानेवारी २०१८ रोजी महोत्सवाची सुरुवात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. ते ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. ते रागांच्या अलगद सादरीकरणासाठी ओळखले जातात. ही तिन्ही संगीत परंपरा एकाच गाण्यामध्ये सदर करण्याची त्यांची हातोटी आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता सितारवादक उस्ताद शाहिद परवेज या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात सितारवादकाच्या वादनाने होणार आहे. ते शास्त्रीय संगीतातील प्रख्यात इटवाह घराण्याचे वादक आहेत. साहबदाद खान, इमदाद खान, इनायत खान, वाहिद खान, विलायत खान आणि इमराद खान यांच्या वंशावळीचा वारसा सांगतात.
शनिवारी ६ जानेवारी २०१८ रोजी ‘स्वरांजली’ची सुरुवात श्रीमती कौशिकी चक्रबर्ती यांच्या अत्यंत मधुर, धारदार आणि तेवढ्याच दमदार अशा आवाजातील सुरांनी करणार आहेत. त्या आघाडीचे भारतीय शास्त्रीय संगीत गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या कन्या आहेत. त्या कोलकाता येथील एका प्रख्यात संगीत कुटुंबातून आल्या आहेत. त्या पतियाला घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. ‘स्वरांजली’ची सांगता ख्यातनाम बसरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पवित्र अशा बासरीसुरांनी होणार आहे. जागतिक कीर्तीचे ख्यातनाम कलाकार आणि बासरी आणि बांबू बासरीवादक चौरसिया यांचे वादन हे महोत्सवातील एक अत्युच्च क्षण असेल. शास्त्रीय संगीताच्या कक्षा रुंदावत ते सर्वसामान्यांपर्यंत घेवून जाण्याचे श्रेय ज्यांना जाते त्यांच्यापैकी ते एक दुर्मिळ कलाकार आहेत.
'स्वरप्रभा चॅरीटेबल ट्रस्ट'ची स्थापना प्रख्यात शास्त्रीय संगीत कलाकार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ते या संस्थेचे अध्यक्ष आणि प्रेरणास्त्रोतही आहेत. संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी संस्थेने स्वतःला वाहून घेतले आहे. संस्था युवाकलाकारांना व्यासपीठ मिळवून देते आणि होतकरू कलाकारांना मदत करते.