स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 08:00 AM2019-04-23T08:00:00+5:302019-04-23T08:00:00+5:30

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका संदीप पाठक साकारत आहे.

Swapnil Joshi and Sandeep Pathak for the first time Working Together In 'Mogra Fulala MOvie' | स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये झळकणार एकत्र

स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये झळकणार एकत्र

googlenewsNext

श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका  अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका संदीप पाठक साकारत आहे. हा सुनीलचा खूपच चांगला मित्र आहे, असे हे पात्र आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रासारखे या दोघांचे नाते आहे. सॉफ्टवेअरच्या व्यवसायामध्ये या दोन मित्रांची भागीदारी सुद्धा आहे. सुनील कुलकर्णी सारख्या मित्राला मदत करायला हा मित्र नेहमी तयार असतो.  

 
सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात... या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचा मित्र बनलेला संदीप पाठक यांचा वेगळाच लुक यामध्ये बघायला मिळत आहे. वेगळ्या गेटअपमधील संदिप पाठक तर या फोटोमध्ये कमालीचा वेगळा दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री यातून व्यक्त होत असून, त्यांच्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.


आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना संदीप पाठक म्हणाला की ‘मला अभिनेता म्हणून नेहमी असं वाटतं की प्रत्येक पात्राला महत्व असलेला सिनेमा करायला मिळावा. उत्तम दिग्दर्शक, अनुभवी कलाकारांसोबत काम करता यावं, दर्जेदार प्रोजेक्टमधे आपला खारीचा वाटा असावा, माझ्या ह्या सगळ्या इच्छा  "मोगरा फुलला" या सिनेमातून पूर्ण होत आहेत. 


संदीप पाठकने 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एक डाव धोबीपछाड', 'शहाणपण देगा देवा' आणि 'एक हजाराची नोट' यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. तर 'फू बाई फू', 'घडलंय बिघडलंय', 'असंभव', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', अशा अनेक मालिकांतून त्यांनी काम केले आहे. तसेच ‘असा मी असामी, 'लग्नकल्लोळ', 'जादू तेरी नजर', 'ज्याचा शेवट गोड', 'सासू माझी धांसू' या नाटकांतून अभिनय केला आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाच्या एकपात्री प्रयोगातून संदीप पाठक आपल्याला बघायला मिळाले आहेत. या त्यांच्या अभिनयामुळे एक चतुरस्र अभिनेता अशी संदीप पाठक यांची ओळख बनली आहे.  ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Swapnil Joshi and Sandeep Pathak for the first time Working Together In 'Mogra Fulala MOvie'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.