५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? 'बाई गं'चा धमाल टिझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:06 IST2024-06-21T13:05:09+5:302024-06-21T13:06:54+5:30
हटके कथानक असलेल्या स्वप्नील जोशीच्या बाई गं सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (bai ga, swapnil joshi)

५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? 'बाई गं'चा धमाल टिझर रिलीज
मराठी मनोरंजन विश्वात सतत नवनवीन विषयांवर आधारीत सिनेमे येत राहतात. या वर्षात 'नाच गं घुमा', 'स्वरगंधर्व सुधीर फडके', 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' असे सिनेमे भेटीला आले. अशातच एका आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे 'बाई गं'. स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाचा धमाल टिझर रिलीज झालाय. या टिझरमध्ये वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या ५ जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा नवरा पूर्ण करू शकेल का ? अशी गोष्ट दिसतेय.
'बाई गं' सिनेमाचा धमाल टिझर
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ. ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्माआधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण एका नवऱ्याला पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ह्या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे आपल्याला 'बाई गं' ह्या सिनेमाद्वारे समजेल. या सिनेमाचा धमाल टिझर आज रिलीझ झालाय. टिझरमध्ये स्वप्नील जोशीला किती कसरत करावी लागते हे दिसतंय. या सिनेमात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे हे कलाकारही झळकणार आहेत.
कधी रिलीज होणार 'बाई गं'?
"बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट १२ जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.