स्वप्नील जोशी बनला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 04:58 AM2018-01-12T04:58:38+5:302018-01-12T10:28:38+5:30

मराठी सिनेमाप्रेमींना आता विविध प्रकारच्या सिनेमांचा आनंदोत्सव साजरा करता येणार आहे,तोही एका बटणाच्या साहाय्याने, टाटा स्काय मराठी सिनेमा, ही ...

Swapnil Joshi became brand ambassador | स्वप्नील जोशी बनला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

स्वप्नील जोशी बनला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

googlenewsNext
ाठी सिनेमाप्रेमींना आता विविध प्रकारच्या सिनेमांचा आनंदोत्सव साजरा करता येणार आहे,तोही एका बटणाच्या साहाय्याने, टाटा स्काय मराठी सिनेमा, ही नवी सेवा पहिल्यांदाच सादर करण्यात आली आहे,याद्वारे सर्वोत्तम मराठी सिनेमे,गाणी आणि नाटके पाहता येणार आहेत.भारतातील अग्रणीच्या कंटेंट डिस्ट्रिब्युशनच्या व्यासपीठावरून ते सबस्क्राइब करता येणार आहे.फिल्मच्या उद्घाटनावेळी,लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेमांचा खजिना आता या सेवेवर उपलब्ध होईल, असे म्हटले.शेमरूबरोबर भागीदारीत ही सेवा सादर करण्यात आली असून, याद्वारे सबस्क्राइब्रसना 120 पेक्षा जास्त सिनेमे, 500 गाणी आणि सर्वोत्तम अशी नाटके पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना दिवसभरात जाहिरातींच्या कुठल्याही अडथळ्यांशिवाय तीन सिनेमे पाहता येतील, यात विनोदी आणि थरारक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमांचा समावेश असेल. या नव्या सेवेमुळे टाटा स्कायवर 24X7 मराठी सिनेमा सेवा सर्वोत्तम मराठी संहितेसह कुठल्याही जाहिरातींच्या अडथळ्यांविना अनुभवता येणार आहे,तसेच डीटीएच व्यासपीठावरून दर रविवारी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचाही आनंद घेता येणार आहे.

या उद्घाटनावेळी टाटा स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरूण उन्नी म्हणाले की, ``टाटा स्काय मराठी सिनेमा, टाटा स्काय बांगला सिनेमा आणि टाटा स्काय पंजाब दे रंग यासारखीच सेवा आहे, प्रेक्षकांची प्रादेशिक सिनेमांची मागणी व स्वारस्य लक्षात घेऊनच आम्ही या सेवा सादर केल्या आहेत - उच्च दर्जाचे सिनेमे आणि नाटके प्रेक्षकांना कुठल्याही जाहिरातींद्वारे सुलभतेने पाहता येणार आहे. मराठी सिनेमाचे या पुनरुथ्थानाचे स्वागत मराठी भाषिकांक़डून झाले आहेच, शिवाय देशभऱातील सिनेमा प्रेमींकडूनही झाले आहे. मराठीतील सर्वोत्तम सिनेमे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही हे नवे उत्पादन सादर केले आहे.''

शेमरू एंटरटेन्मेंट लिमिटेडचे संचालक हिरेन गाडा पुढे म्हणाले की, ``शेमरू एंटरटेन्मेंटला टाटा स्कायबरोबर भागीदारी करताना, आणि मराठीतील सर्वोत्तम सिनेमे, गाणी व नाटके टाटा स्काय मराठी सिनेमा या सेवेतून सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या सेवेसाठी शेमरूच्या विशेष आणि निवडक संग्रहातून संहिता व कार्यक्रम सादर केले जातील. आम्ही नेहमीच व्यावसायिक भागीदारांसाठी मूल्याधिष्ठित सेवा देतो आणि आमच्या संहितेतील सर्वोत्तमता देऊ करतो. सामर्थ्यशील, कणखऱ आणि विस्तारीत संहिता आणि प्रमाणित प्रोडक्शन मूल्ये यांच्यासह मराठी सिनेमाचे केवळ व्यवस्थापनच नाही तर येत्या काही काळापासून वाढही होत आहे, यामुळे प्रादेशिक मर्यादाही गळून पडल्या असून, सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. आमच्या नव्या सेवेचाही प्रेक्षक आनंद लुटतील असा आम्हाला विश्वास वाटतो.''

टाटा स्काय मराठी सिनेमामध्ये अलिकडचे, पैसा पैसा (2016), सिंड्रेला (2015), बस स्टॉप (2017), कट्टीबट्टी (2015) आणि इतर अनेक सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. या सेवेद्वारे लहानपण देगा देवा, मी नथुराम गोडसे बोलतोय, लगे रहो राजाभैय्या, उसना नवरा आणि काणेकरी अशी रंगभूमीवरील उत्तम नाटकेही सादर करण्यात येणार आहेत. ही सेवा #1205 या क्रमांकावर 24x7 उपलब्ध असेल.टाटा स्कायवर टाटा स्काय बॉलिवुड प्रीमियम, टाटा स्काय क्लासिक सिनेमा, टाटा स्काय पंजाब दे रंग, टाटा स्काय बांगला सिनेमा, टाटा स्काय वर्ल्ड सिरीज आणि टाटा स्काय मुंबई फिल्म फेस्टिवल आदी सेवा सुरू आहेत.तसेच टाटा स्काय हे सर्व प्रकारच्या रसिकांसाठी  सिनेमा, विनोद, प्रेरणादायी, सांगीतिक आणि लहान मुलांचे विविध सिनेमा सादर करणार मनोरंजनाचे एकमेव व्यासपीठ ठरले आहे.

Web Title: Swapnil Joshi became brand ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.