बालपणी असा दिसायचा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट हिरो ? तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 07:26 PM2021-03-04T19:26:08+5:302021-03-04T19:28:58+5:30

फोटोत त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले असून एक टक कॅमेराकडे पाहतोय.

swapnil joshi Childhood photo Caught Everyone Attention | बालपणी असा दिसायचा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट हिरो ? तुम्ही ओळखलं का?

बालपणी असा दिसायचा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट हिरो ? तुम्ही ओळखलं का?

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटोत एक मुलगा दिसतोय. फोटोत त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले असून एक टक कॅमेराकडे पाहतोय. फोटोत दिसणारा गोंडस चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी. स्वप्निल आज यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. स्वप्निलच्या लहानपणीचा फोटो पाहून चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाल. फोटोत चिमुरडा स्वप्निल खूपच क्युट दिसतोय.  फॅन्सना त्याचा हा फोटो खूपच भावला आहे. त्यामुळे फोटो शेअर होताच लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.

आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलनं स्वप्नीलनं तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरही स्वप्नीलनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेकमेट, दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मितवा, मोगरा फुलला अशा विविध चित्रपटांमधून स्वप्नीलने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. स्वप्नील सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो.


बाप-लेकीचे हे फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल सो क्यूट, स्वप्निल जोशीने लेक मायरासोबतचा गोड फोटो केला शेअर

लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये स्वप्नीलच्या रूपात दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबाही पाहायला मिळत आहे. बापाचे लेकीवरील हे प्रेम पाहून फॅन्सही भारावले असून त्यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. खरेतर मायराच्या जन्मानंतर त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. मायरा विषयी खास गोष्टी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नीलने सांगितल्या होत्या.


मी माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक वेळा घराच्या बाहेर असतो. त्यामुळे ती मला आवर्जून स्क्रीनवर पाहते. जेवताना तर ती माझी गाणी पाहाते. माझी गाणी पाहिल्याशिवाय तिला जेवण जातच नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पण कोणत्या गाण्यात एखादी नायिका माझ्या जवळ आली किंवा कोणत्या अभिनेत्रीने मला जवळ घेतले, मला मिठी मारली तर ती जोरारजोरात रडायला लागते. माझ्या वडिलांना कोण कसा काय हात लावू शकते असा प्रश्न तिला पडतो. अभिनेत्री माझ्या मिठीतून बाहेर पडली की, ती हसायला लागते. ही गोष्ट पाहून आम्हाला देखील खूप मजा वाटते.

Web Title: swapnil joshi Childhood photo Caught Everyone Attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.