सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:38 AM2024-06-04T09:38:12+5:302024-06-04T09:39:08+5:30

स्वप्नील जोशी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सहा अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्या (swapnil joshi, bai ga)

swapnil joshi new movie bai ga with sukanya mone prarthana behere dipti devi | सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा

सहा अभिनेत्रींचा एक हिरो! स्वप्नील जोशीच्या आगामी 'बाई गं' सिनेमाची शानदार घोषणा

मराठी मनोरंजन विश्वातील रोमँटिक हिरो म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी. स्वप्नीलने आजवर विविध सिनेमांमधून अभिनेता म्हणून स्वतःची छाप पाडलीय. काहीच दिवसांपुर्वी स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला 'नाच गं घुमा' सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. आता स्वप्नील जोशीच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. 'बाई गं' असं स्वप्नीलच्या आगामी सिनेमाचं नाव असून यात स्वप्नीलसोबत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत.

'बाई गं' सिनेमाची घोषणा

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवा कोरा, धमाल असलेला  'बाई गं' या सिनेमाची घोषणा झालीय.  पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे. आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. एक अभिनेता आणि सोबत तब्बल ६ नायिका ही संकल्पनाच या सिनेमाची उत्सुकता वाढविणारी आहे. हा चित्रपट  प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. 

सिनेमात लोकप्रिय कलाकारांची वर्णी

'बाई गं' सिनेमात दमदार कलाकारांची जमेची बाजू ठरणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून यामध्ये तो वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान अशा अफलातून अभिनेत्री 'बाई गं' चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोबतच सागर कारंडे देखील विशेष भूमिकेत असणार आहे.

कधी रिलीज होणार 'बाई गं'?

'बाई गं' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. तर, गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहीली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. १२ जुलैला 'बाई गं' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: swapnil joshi new movie bai ga with sukanya mone prarthana behere dipti devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.