स्वप्नील जोशीचा पहिला ब्लॉग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 11:15 AM2017-02-06T11:15:29+5:302017-02-06T16:45:29+5:30

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. या चित्रपटात ...

Swapnil Joshi's first blog | स्वप्नील जोशीचा पहिला ब्लॉग

स्वप्नील जोशीचा पहिला ब्लॉग

googlenewsNext
वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १० फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन फंडेदेखील जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याच चित्रपटाचा प्रमोशन फंडा म्हणून अभिनेता स्वप्नील जोशी याने पहिल्यांदा ब्लॉग  सोशलमीडियावर लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या ब्लॉगला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तुझा पहिलाच प्रयत्न खूपच सुंदर आणि छान म्हणत प्रतिक्रियादेखील जास्त प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे.


       
        विशेष म्हणजे या चित्रपटात हा अभिनेता स्त्री वेशात पाहायला मिळणार आहे. त्याची ही भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक ही आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे सुबोध भावे आणि स्वप्नील जोशीचा याराना या चित्रपटात रंगणार आहे. तसेच अभिनेत्री  नीता शेट्टी ही अभिनेत्रीदेखील पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करत आहे.त्याचबरोबर बॉलिवुडचा तगडा दिग्दर्शक निशिकांत कामत हादेखील या चित्रपटात झळकणार आहे. तो या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणूनच हा चित्रपट अशा विविध वैशिष्यपूर्णानी रंगणार आहे.  इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बºहान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी फुगे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता प्रेक्षकांना असा  मनोरंजक चित्रपट पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 
            

Web Title: Swapnil Joshi's first blog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.