स्वप्नील जोशीच्या 'समांतर' या वेब सिरीजला, ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:00+5:30
'समांतर' या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे
‘समांतर’ या वेब मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रेक्षकांना या वेबमालिकेतील स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.
स्वप्नील जोशी म्हणतो की, “समांतर’चे लेखन सुहास शिरवळकर यांनी केले असून ती माझी आवडती कादंबरी आहे. या आधी मी त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अणि काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमात काम केले होते. मला मनापासून वाटते कि, त्यांच्या लेखणीत खूप ताकद आहे आणि त्यांच्या लिखाणावर खूप चांगले काम होऊन उत्तम दर्जाचा व्हिजुअल कॉन्टेन्ट तयार होऊ शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला 'समांतर' करायला मिळते आहे. ‘दुनियादारी’ केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
“शुभारंभ झाल्यापासून या मालिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ही मलिका ८० लाख लोकांनी पाहिली असून मराठी वेबसीरिजच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे.