स्वप्निल दिसणार खलनायकाच्या भूमिकेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 04:03 AM2018-05-05T04:03:01+5:302018-05-05T09:35:42+5:30
प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने आपलंसं करणारा मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे वेड लावणारे ...
प रेक्षकांना आपल्या अभिनयाने आपलंसं करणारा मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी आणि प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे वेड लावणारे एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर या जोडीला 'रणांगण' चित्रपटाच्या माध्यमातून भेटण्याची संधी मिळणार आहे. नुकत्याच सोशल मीडियावर रिलीज झालेल्या रणांगणच्या टीजरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लुक वेगळा असला तरी प्रेक्षकाना भावणारा आणि आकर्षित करणारा दिसतोय. चित्रपटाच्या टीझरपासूनच ते ट्रेलरपर्यंत त्याचे वेगळेपण जाणवायला लागले आहे. आणि या आगळ्यावेगळ्या लुकमुळे ते अजून अधोरेखित होते आहे.
‘रणांगण’ चित्रपटामधील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशिल?
माझी या चित्रपटामध्ये श्लोक नावाची व्यक्तिरेखा आहे . ज्याचे आयुष्याचे तत्वज्ञान असे आहे की, आपण सगळेच खलनायक आहोत. काही पोटात आहेत काही ओठात आहेत. म्हणजे, आपल्या प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस दडलेला आहे तसाच, आपल्या प्रत्येकामध्ये एक वाईट माणूस पण दडलाय. वाईट माणसं आपल्या सगळ्यांमध्येच आहेत. अशा तत्त्वज्ञानावर असणारी श्लोक ही व्यक्तिरेखा आहे. त्याच्या दिसण्यापासून त्याचे वागणे बोलणे आणि देहबोली सगळंच वेगळं आहे.
चित्रपटाची कथा कशावर आधारित आहे?
चित्रपटामध्ये राजकारणातील नाट्य असलेला हा फॅमिली ड्रामा आहे. खूप वर्षांत मराठी मध्ये राजकीय नाट्य आले नाही आहेत. ‘रणांगण’ हे युद्ध या विषयाकडे झुकणारे नाव असले तरी युद्ध म्हणजे फक्त हत्ती, घोडे, सैनिक भाले तलवारी असे नसते. आपण रोजच्या जगण्यासाठीही युद्ध लढत असतो. तसेच हे एक नातेसंबंधाचे रणांगण आहे. या युद्धात काय होत, कोण-कोण त्याला बळी पडतात आणि किती रक्तपात होतो, हे बघण्यात थ्रिल आहे.
चॉकलेट बॉय च्या भूमिकेतून बाहेर पडून खलनायकाची भूमिका साकारली या बद्दल काय सांगशिल?
'भिकारी' सिनेमातून मी एक वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आलो. आणि लोकांना माझी ती भूमिका खूप भावली. मला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि हे बघून माझा 'रणांगण' बद्दलचा उत्साह वाढला आहे. मला आजवर भरपूर लोकांनी सांगितले की, तू चॉकलेट बॉय या भूमिकेच्या बाहेर पडून काहीतरी हटके भूमिका कर आणि मीही त्याच्याच शोधात होतो. ‘रणांगण’मुळे माझ्याकडे वेगवेगळे रोल यायला सुरुवात होईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करतांना आलेला अनुभव कसा होता?
सचिन पिळगावकर आणि मी पहिल्यांदा एकमेकांच्या आमने-सामने असलेल्या भूमिकेत दिसणार आहोत. ही माझ्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण खºया आयुष्यात ते मला पितृ-स्थानी आहेत. त्यांच्यासोबत मला काम करायला मिळणे हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे.