स्वप्निल खेळणार नाही रंगांची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2016 08:20 PM2016-03-21T20:20:31+5:302016-03-21T13:23:56+5:30
होळी, धुलिवंदन या सणांना रंगांची उधळण करुन तरुणाई भरमसाठ पाण्याचा अपव्यय दरवर्षीच करीत असते. ...
होळी, धुलिवंदन या सणांना रंगांची उधळण करुन तरुणाई भरमसाठ पाण्याचा अपव्यय दरवर्षीच करीत असते. परंतू आताची परिस्थिती ही गंभीर असुन सध्या आपल्याला दुष्काळाच्या झळांचा सामना करावा लागत असुन पाणीसाठी देखील कमी आहे. मग अशा परिस्थितीत आपला हॅन्डसम हंक स्वप्निल जोशी पुढे सरसावला असुन तो नागरिकांना रंगांची होळी खेळू नका, पाणी वाचवा असा सामाजिक संदेश सध्या सोशल नेटवर्किंग साईट्स वरुन देत आहे. स्वप्निल एका व्हीडीओच्या माध्यमातून सांगत आहे, आपण दरवर्षी होळीला रंगांची उधळण करतो. गेल्या वर्षी पाण्याचा साठा ४१ ट्क्के होता. तर यावषीर्ची परिस्थिती त्यावरुन गंभीर असुन पाणीसाठी कमालीचा खाली म्हणजेच २६ टक्क्यांवर आला आहे.
पुढचा महिना सव्वा महिना पुरेल एवढाच पाणी साठा सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. ही परिस्थिती अतिशय भीषण आहे. आणि त्यामुळेच मी यावर्षी पाण्याची, रंगांची होळी खेळणार नाही आणि तुम्हीही खेळू नका. सुका रंग देखील खेळू नका कारण सुका रंग काढायला देखील पाणी लागते. यावर्षी आपण सर्वजण एकमेकांवर आयुष्यातील रंगांची उधळण करुयात. आनंदांचा, हसण्याचा आणि शुभेच्छांच्या रंगाने आपण एकमेकांना रंगवुयात. स्वप्निलने दिलेला हा सामाजिक संदेश नक्कीच सर्वजण आमलात आणतील अन पाणी वाचविण्यास मदत करतील.
या #VideoMsg द्वारे एक विनंती माझ्या सगळ्या चाहत्यांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या महाराष्ट्राला.वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची. - तुमचाच स्वप्निल जोशी.
Posted by swapnil joshii on Sunday, March 20, 2016
{{{{twitter_post_id####}}}}नमस्कार. एक नम्र विनंती.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. https://t.co/UIkmfsXIz4— Swwapnil Joshi (@swwapniljoshi) March 21, 2016