'ताई, दिवाळीला जिन्स नक्की घ्या!'; फाटक्या जिन्समधील व्हिडीओमुळे ट्रोल झाली अमृता खानविलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:29 AM2021-10-02T10:29:59+5:302021-10-02T10:30:27+5:30

अमृता खानविलकरचा इंस्टाग्रामवरील व्हिडीओ चर्चेत आला आहे.

'Tai, definitely take jeans for Diwali!'; Amruta Khanwilkar became a troll due to the video in torn jeans | 'ताई, दिवाळीला जिन्स नक्की घ्या!'; फाटक्या जिन्समधील व्हिडीओमुळे ट्रोल झाली अमृता खानविलकर

'ताई, दिवाळीला जिन्स नक्की घ्या!'; फाटक्या जिन्समधील व्हिडीओमुळे ट्रोल झाली अमृता खानविलकर

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. तसेच तिने मराठीसोबतच हिंदी सिनेइंडस्ट्रीतही काम केले आहे. अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच अमृताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरून अमृता खानविलकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती डान्स करताना दिसते आहे. एकीकडे तिच्या डान्स स्टेप पाहून काहींनी तिच्या व्हिडीओला पसंती दिली आहे. तर काहींनी निगेटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. इतकेच नाही तर तिच्या व्हिडीओवर सेलिब्रेटींनीही कमेंट्सही केल्या आहेत.

एका युजरने म्हटले की, दिवाळीला यावेळेस नवीन जिन्स घेऊन टाक. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, कपडे फाटले असतील तर मला संपर्क कर. आणखी एकाने लिहिले की, दिवाळीला एक जिन्स नक्की घ्या ताई.  एकाने तर भंगार कपडे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, जिन्स शिवून घेना अमू.


अमृता सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि त्यामुळे ती चर्चेत येत असते. अमृताने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.

मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये तिने धमाकेदार काम केले आहे. अमृताने राझी, मलंग या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Web Title: 'Tai, definitely take jeans for Diwali!'; Amruta Khanwilkar became a troll due to the video in torn jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.