रंग लागला, तुझा छंद लागला...! लंडनच्या ब्रिजवर सोनाली कुलकर्णी व फुलवा खामकरचा अफलातून डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 13:49 IST2022-07-04T13:46:20+5:302022-07-04T13:49:56+5:30
Tamasha Live, Sonalee Kulkarni and Phulawa Khamkar dance Video : ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘रंग लागला’ या गाण्यावर सोनाली आणि फुलवा बेभान होऊन डान्स करत आहेत. व्हिडीओ पाहून फिदा व्हाल

रंग लागला, तुझा छंद लागला...! लंडनच्या ब्रिजवर सोनाली कुलकर्णी व फुलवा खामकरचा अफलातून डान्स
महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) हा सिनेमा येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी चर्चा आहे ती या चित्रपटातील गाण्यांची. होय, संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक चर्चा आहे ती ‘रंग लागला, तुझा छंद लागला’ (Rang Lagala) या गाण्याची. हे गाणं सुपरहिट झालं आहे. या गाण्यावरच्या अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक रिल पाहून तर तुम्ही फिदा व्हाल. होय, सोनाली कुलकर्णी आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर (Phulawa Khamkar) या दोघींनी या गाण्यावर धम्माल डान्स केला आहे आणि तो सुद्धा लंडनमधील प्रसिद्ध टॉवर ब्रिजवर. सोनालीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘तमाशा लाईव्ह’मधील ‘रंग लागला’ या गाण्यावर सोनाली आणि फुलवा बेभान होऊन डान्स करत आहेत. ब्रिजवरच्या गर्दीतही दोघीही दिलखुलास डान्स करताना पाहून तुम्हीही दोघींचं कौतुक कराल.
सोनाली व फुलवाच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनी सुद्धा भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘तुला तर मानलंच पाहिजे यार, खरंच तू भारी आहेस एकदम’, अशी कमेंट कुशल बद्रिकेने केली आहे. ‘सो ब्युटिफुल’ अशी कमेंट करत अमृता सुभाषने फुलवा व सोनालीचं कौतुक केलं आहे. ‘तुमची जादू साता समुद्रापार,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. पत्रकार शेफाली असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
‘तमाशा लाईव्ह’ या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह सचित पाटील, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव , भरत जाधव अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर संजय जाधव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सिनेमासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. तमाशा लाईव्ह या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सिनेमात नांदी हा प्रकार पाहायला मिळणार आहे.