सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी तमीळ रोमँटिक सुरेल भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 07:30 PM2019-02-01T19:30:00+5:302019-02-01T19:30:00+5:30

व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमीळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे.

Tamil romantic surre visit to fans of Savani Ravindra | सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी तमीळ रोमँटिक सुरेल भेट

सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी तमीळ रोमँटिक सुरेल भेट

googlenewsNext
ठळक मुद्दे सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना दिली एक सुरेल रोमँटिक गीताची भेटसावनी रविंद्रने तमीळ भाषी सिनेमांसाठी गायली अनेक गाणी

व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमीळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. सतिशकांतने लिहिलेल्या ह्या रोमँटिक गीताला शुभंकर शेंबेकरने संगीत दिले आहे आणि सावनी रविंद्रसोबत गायलेही आहे. ‘सावनी ओरिजनल्स’ सीरिजमधले हे पहिले गाणे आहे.

सावनी रविंद्रने तमीळ भाषी सिनेमांसाठी अनेक गाणी गायली आहेत. 'ईमाई', 'कुटाल' हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत. 'वेनिलाविन सलाईगल्ली' 'कत्रिल इधगळ','उईरे उईरे' सिंगल्ससुद्धा प्रसिध्द आहेत. ‘नान सोल्लव्वा’ विषयी सावनी रविंद्र सांगते, दक्षिणेमध्ये माझे बरेच चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून तमीळ भाषी चाहत्यांकडून सतत मला एखादे ओरिजनल साँग गाण्याची फर्माइश होत होती. ती इच्छा मी ह्या रोमँटिक गाण्याने पूर्ण केली आहे. मुख्य म्हणजे ह्या गाण्याचे संगीत नियोजन चेन्नईमधल्या म्युझिशियननी केल्याने गाणे खूप अस्सल तमीळ मातीतले वाटते आहे. चित्रीकरणही गाण्याला साजेसेच करण्यात आले आहे. तमीळ आणि मराठी कानसेनांच्या गाण्यांविषयीच्या आवडींमध्ये साम्य असते असे मला वाटते. त्यामूळे हे सुमधूर गीत मराठी रसिकांनाही आवडेल असा मला विश्वास आहे. 


‘सावनी ओरिजनल्स’विषयी सावनी रविंद्र सांगते, सूरांना भाषेचे बंधन नसते. सावनी अनप्लग्डला रसिकांनी खूप छान प्रतिसाद दिला. तो पाहून यंदाच्या वर्षीचा माझा संकल्प आहे की, यंदा मी ओरिजनल गाणी घेऊन येणार आहे. तमीळनंतर बंगाली, पंजाबी, नेपाळी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सावनी ओरिजनल्स घेऊन येण्याचा मानस आहे. 

Web Title: Tamil romantic surre visit to fans of Savani Ravindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.