टॅक्सी ड्रायव्हर ते मराठी सिनेसृष्टीतील 'हँडसम हंक'; महाजनी यांना असा मिळाला होता चित्रपटात पहिला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 03:00 AM2023-07-15T03:00:53+5:302023-07-15T03:17:05+5:30

'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' आदी चित्रपटांतील त्यांची भूमिका तर सुपरहिट ठरली.

Taxi Driver to Handsome Hunk of Marathi Cinema how ravindra mahajani got his first break in the film | टॅक्सी ड्रायव्हर ते मराठी सिनेसृष्टीतील 'हँडसम हंक'; महाजनी यांना असा मिळाला होता चित्रपटात पहिला ब्रेक

टॅक्सी ड्रायव्हर ते मराठी सिनेसृष्टीतील 'हँडसम हंक'; महाजनी यांना असा मिळाला होता चित्रपटात पहिला ब्रेक

googlenewsNext

मराठी चित्रपट सृष्टीत 80 चे दशक गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. 'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' आदी चित्रपटांतील त्यांची भूमिका तर सुपरहिट ठरली. मात्र, या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. हे तुम्हाला माहिती आहे का? 

3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली -
अभिनेता रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत. मात्र ते टॅक्सी चालवतात, असे समजल्यानंतर, त्यांच्या अनेक नातलगांनी त्यांच्याशी असलेला संपर्क कमी केला होता. पण ते जेव्हा एक अभिनेता म्हणून नावारुपाला आले, तेव्हा त्यांचे हेच नातलग पुन्हा त्यांच्या जवळ आले.

महत्वाचे म्हणजे, रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले. एवढेच नाही, तर ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
 

Web Title: Taxi Driver to Handsome Hunk of Marathi Cinema how ravindra mahajani got his first break in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.