धम्माल मस्तीत रंगली ‘लाल इश्क’ची टीम

By Admin | Published: May 26, 2016 02:36 AM2016-05-26T02:36:24+5:302016-05-26T02:36:24+5:30

स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘लाल इश्क’ चित्रपटाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने लोणावळा येथे धमाल मस्ती केली. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी

The team of 'Lal Ishq' played with Dhammal | धम्माल मस्तीत रंगली ‘लाल इश्क’ची टीम

धम्माल मस्तीत रंगली ‘लाल इश्क’ची टीम

googlenewsNext

स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘लाल इश्क’ चित्रपटाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने लोणावळा येथे धमाल मस्ती केली. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपल्या हटके अंदाजात पार्टीमध्ये आपल्या भूमिकेविषयी एका सुंदर नाटकाचे सादरीकरण केले. तसेच या एन्जॉय पार्टीत लाल इश्क टीमच्या कलाकारांनी आपल्या भूमिकेची ओळखदेखील करून दिली आणि चित्रपटातील ‘चिमणी चिमणी’ या गाण्याच्या लाइव्ह सादरीकरणामुळे पार्टीत आणखीनच रंगत आली. विशेष म्हणजे, यानिमित्ताने सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी याने सुरेल आवाजात प्रथमच गायलेल्या या गाण्यामुळे पार्टीला चार चाँद लागले. तसेच पीयूष रानडे, स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, आरती केळकर, कस्तुरी वावरे आणि खुद्द अमितराज यांनीदेखील गाणे गात ठेका धरला. स्वप्निल आणि अंजना या सिनेमाच्या जोडगोळीनेदेखील पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला. या चित्रपटाची पटकथा व संवाद शिरीष लाटकर यांचे असून, अमितराज, नीलेश मोहरीर या दोघांनी मिळून या चित्रपटाला संगीत दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २७ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Web Title: The team of 'Lal Ishq' played with Dhammal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.