‘हिरड्या दाखवून हसण्याची मला लाज वाटत नाही’, सोशल मीडियावर व्यक्त झाली तेजस्विनी पंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 08:27 PM2021-05-19T20:27:25+5:302021-05-19T20:32:54+5:30

तेजस्विनी पंडित म्हणते "perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं...छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या...

Tejaswini Pandit breathtakingly beautiful In This laughing smiling Photo trending on social media | ‘हिरड्या दाखवून हसण्याची मला लाज वाटत नाही’, सोशल मीडियावर व्यक्त झाली तेजस्विनी पंडित

‘हिरड्या दाखवून हसण्याची मला लाज वाटत नाही’, सोशल मीडियावर व्यक्त झाली तेजस्विनी पंडित

googlenewsNext

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही तेजस्विनी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहयला मिळतील. नुकताच शेअर केलेल्या तेजस्विनीच्या या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोत दिलखुलास हसताना तेजस्विनी दिसते आहे. या फोटोसह तेजस्विनीने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. तिने तिच्या हसण्याच्या स्टाइलबद्दल सांगितले आहे.

विशेष म्हणजे या फोटोत स्वतः किती सुंदर किंवा परफेक्ट आहे असा दाखवण्याचा प्रयत्न नसून मी जशी आहे तशी आहे तिच्या व्यक्तीमत्वाबद्दल सांगणारी पोस्ट तिने शेअर केली आहे. विशेष म्हणजे दिलखुलास हसणं तेजस्विनीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे.नेहमीप्रमाणे तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

तेजस्विनी म्हणते "perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत...मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं...छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या...दात दाखवून असो, वा खळखळून असो....मला' हसायला 'आवडतं हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात...हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका.ते एका चित्रपटात म्हटलंय ना,क्या पता कल हो ना हो.....!!!

Web Title: Tejaswini Pandit breathtakingly beautiful In This laughing smiling Photo trending on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.