तेजस्विनीच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, चाहत्यांना पडली भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:35 IST2019-05-09T12:30:23+5:302019-05-09T12:35:49+5:30
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

तेजस्विनीच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, चाहत्यांना पडली भुरळ
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नेहमीच तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो टाकत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीचा या फोटोतील सोज्वळ सौंदर्य साऱ्यांना भावले आहे.
तेजस्विनी सोशल मीडियावर तिचा साडीमधला फोटो शेअर केला आहे. साडीत तिच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. तेजस्विनीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने आपली स्ट्रगल पिरीयडच्या आठवणींना उजाळा दिला होता. याबाबतचा एक किस्सा तिने शेअर केला होता. इतरांप्रमाणेही तिच्या आयुष्यात असा एक क्षण आला ज्याचा विचार कुणीही करुच शकत नाही. मात्र त्यावेळीसुद्धा हार न मानता आपला स्ट्रगल सुरूच ठेवला. एकवेळ अशीही होती की घरात जेवायलाही पैसे नव्हते.
त्यामुळे मैद्याची बिस्किटं खाऊन तिने दिवस काढले. इतकेच नाही तर हातात पैसे नसल्याने वीज बिलही भरता यायचे नाही. म्हणून जोपर्यत बिल भरण्या इतपत पैसे नाही तोपर्यंत अंधारातच दिवस काढले. करिअरच्या या यशाचा आनंद अनुभवत असताना स्ट्रगलमुळेच तेजस्विनी एक अभिनेत्री म्हणून रसिकांच्या भेटीला आली त्यामुळे त्या अनेक आठवणी तिच्या मनात आजही घर करून आहेत.