'तेरा ध्यान किधर है'; शाहिद कपूरमुळे बिघडला कार्तिकी गायकवाडचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 13:17 IST2023-05-15T13:16:30+5:302023-05-15T13:17:25+5:30
Kartiki Gaikwad: कार्तिकी फोटो काढत असतानाच त्यात शाहिद कपूर आला आणि..

'तेरा ध्यान किधर है'; शाहिद कपूरमुळे बिघडला कार्तिकी गायकवाडचा फोटो
'सारेगमप लिटिल चॅम्प'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). कमी वयात कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कार्तिकीने मराठी सिनेविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा होते. कार्तिकी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने काही फोटो शेअर केले. यात तिच्या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करायला सुरुवात केली आहे.
अलिकडेच कार्तिकीने तिच्या वडील आणि भावासह एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. तसंच मराठीसह बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रीदेखील या कार्यक्रमात होते. यावेळी कार्तिकी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासोबत फोटो घेत असताना तिच्या फोटोत शाहिद कपूरदेखील आला. विशेष म्हणजे त्याने यावेळी दिलेल्या पोझमुळे नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करायला सुरुवात केली आहे.
या फोटोमध्ये शाहिद त्याच्याच नादात आहे. मात्र, त्याच्यापुढे कोणी तरी फोटो काढतंय याकडे त्याचं जराही लक्ष नाही. तो त्याच्याच विचारात गुंग आहे. परंतु, यावेळी त्याने ज्या पद्धतीने कार्तिकीकडे पाहिलंय ते पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले नेटकरी?
तेरे ध्यान किधर है, हिरो इधर है, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. अगं कार्तिकी शाहिद तुझ्याकडे पाहतोय, शाहिद पाहा कसा बघतोय, अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.