मराठी सिनेमांसाठी ‘परीक्षेचा काळ’; एप्रिल-मेमध्ये होणार गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:19 AM2022-03-25T07:19:17+5:302022-03-25T07:19:59+5:30

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये नवीन सिनेमांची गर्दी होणार असून, शोजसाठी मारामारी करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

testing times for Marathi Cinemas | मराठी सिनेमांसाठी ‘परीक्षेचा काळ’; एप्रिल-मेमध्ये होणार गर्दी

मराठी सिनेमांसाठी ‘परीक्षेचा काळ’; एप्रिल-मेमध्ये होणार गर्दी

googlenewsNext

मुंबई : बऱ्याचदा सिनेमागृहे मिळत नाहीत, शोज कमी मिळतात अशी ओरड करणाऱ्या मराठी सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवर सध्या दुष्काळी चित्र पहायला मिळत आहे. मागील दोन आठवड्यांपासून एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नसून, या आठवड्यातही कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये नवीन सिनेमांची गर्दी होणार असून, शोजसाठी मारामारी करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

आयपीएल असो, पावसाळा असो, किंवा वर्षातील पहिला शुक्रवार असो कशाचीही भीती न बाळगता प्रदर्शित होणाऱ्या मराठी सिनेमांना नेहमीच परीक्षांच्या काळात मात्र ब्रेक लागतो. त्यामुळे या काळात कोणताही मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही.
 
यंदाही तेच चित्र आहे. तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाईल्स’ या हिंदी चित्रपटाचे शोज वाढत असून, पावनखिंड हा मराठी चित्रपट सहाव्या आठवड्यातही चांगला बिझनेस करत आहे. असे असतानाही नवीन मराठी सिनेमा प्रदर्शित होत नसल्याने जाणकारांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 
१ एप्रिल रोजी मी वसंतराव, रुद्र आणि एक नंबर... सुपर हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने पुन्हा मराठी तिकिटबारीवर गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कमी शोज मिळाल्याची ओरडही नक्कीच होईल. 

मोठ्या चित्रपटांचे आव्हान
परीक्षांचा काळ सुरू आहेच, पण त्या जोडीला आरआरआर आणि बच्चन पांडे या दोन चित्रपटांचे आव्हानही मराठी पुढे होते. मोठ्या हिंदी सिनेमांमुळे आपल्याला सिनेमागृहे मिळणार नाहीत, यासाठी मराठी निर्मात्यांनी धाडस केले नाही. खरं तर या काळात प्रत्येक आठवड्याला चांगले कंटेंट असलेला कमी बजेट एक तरी चित्रपट रिलीज करता आला असता. मागील दोन वर्षांपासून बरेच मोठे सिनेमे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असल्याने मराठी सिनेमांपुढे त्यांचे आव्हान असेल. याच जोडीला ‘पुष्पा’सारखे साऊथच्या चित्रपटांचे आव्हानही मराठी समोर असेल.               - अंकित चंदीरामाणी 
                (वितरक, सनशाईन स्टुडिओज)

Web Title: testing times for Marathi Cinemas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.