दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा देखील आहे अभिनेता, या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:16 IST2023-08-05T13:15:41+5:302023-08-05T13:16:23+5:30
Ashwini Ekbote : मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटेदेखील कलाविश्वात कार्यरत आहे.

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा देखील आहे अभिनेता, या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट
मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटेदेखील कलाविश्वात कार्यरत आहे. आईच्या पावलांवर पाऊल टाकत शुभंकरदेखील अभिनय क्षेत्रात दाखल झाला आहे. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत शुभंकरने राणाचे पात्र साकारले आहे. याच मालिकेच्या नायिकेसोबत शुभंकर प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. कन्यादान या मालिकेत वृंदाची भूमिका अमृता बाणे हिने निभावली आहे.
शुभंकर एकबोटे आणि अमृता बाणे दोघेही अनेकदा एकत्र फिरायला जाताना दिसतात. दोघांचे एकत्रित फिरायला जातानाचे व्हिडीओ हे दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यावरून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. आज शुभंकरचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून अमृताने शुभंकरला शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमृताने लव्ह इमोजी शेअर केल्यामुळे हे दोघे प्रेमात आहेत असे बोलले जात आहे. अर्थात या दोघांनी आपले नाते अद्याप जगजाहीर केलेले नाही.
शुभंकर एकबोटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो चिठ्ठी, मंत्र, डार्कलाईट, कन्यादान , चौक, धर्मवीर अशा चित्रपट मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. तर अमृता बाणेबद्दल सांगायचं तर तिने आपल्या करिअरची सुरुवात न्यूज रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून तिला देवी सरस्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. रंग माझा वेगळा, जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून ती भेटीला आली आहे.