मुलीसाठी AIच्या जंजाळात सापडणाऱ्या बापाची थरारक गोष्ट! 'द AI धर्मा स्टोरी'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:39 PM2024-10-07T16:39:50+5:302024-10-07T16:40:54+5:30

मुलीला अडचणीतून सोडवणाऱ्या बापाची हृदयस्पर्शी कथा. पुष्कर जोग करतोय सिनेमाचं दिग्दर्शन (Pushkar jog)

the ai dharma story marathi movie trailer starring pushkar jog smita gondkar deepti lele | मुलीसाठी AIच्या जंजाळात सापडणाऱ्या बापाची थरारक गोष्ट! 'द AI धर्मा स्टोरी'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

मुलीसाठी AIच्या जंजाळात सापडणाऱ्या बापाची थरारक गोष्ट! 'द AI धर्मा स्टोरी'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

वडील - मुलीचे भावनिक नाते अनेक चित्रपटांंमधून आपण आजवर पाहिलंय. पण आगामी चित्रपटात तंत्रज्ञानाच्या जाळ्यात सापडणाऱ्या वडील-मुलीचं खास नातं बघायला मिळणार आहे. या आगामी सिनेमाचं नाव आहे ‘दि एआय धर्मा स्टोरी’. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक क्षण या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा आहे. 

‘दि एआय धर्मा स्टोरी’चा ट्रेलर रिलीज

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित, बियु प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. ट्रेलरमध्ये एआयच्या साहाय्याने फेक व्हिडीओ बनवल्याबद्दल अरविंद धर्माधिकारीच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केल्याचे दिसत असून त्यांच्याकडे धमकावून पैशांची मागणी केली जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? यात धर्मा कसा अडकतोय?त्याच्या मुलीची सुटका होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहेत. दरम्यान, पुष्कर जोग याने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. यावेळी नात्याला तंत्रज्ञानाची जोड लाभली असल्याने या चित्रपटातही काहीतरी हटके असणार हे नक्की! 


या दिवशी रिलीज होणार ‘दि एआय धर्मा स्टोरी’

‘दि एआय धर्मा स्टोरी’ या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः पुष्करने केलं असल्याने प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक बघायला मिळेल यात शंका नाही. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'जबरदस्त' सिनेमातून  मनोरंजन विश्वात पदार्पण करणारा पुष्कर आपल्याला बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्येही दिसला होता. 

Web Title: the ai dharma story marathi movie trailer starring pushkar jog smita gondkar deepti lele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.