"जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही!", स्वप्नील जोशीची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:39 PM2024-02-07T12:39:37+5:302024-02-07T12:40:22+5:30

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला.

"The Bigger artist, the Simpler the Man…Yes, Still!", Special Post by Swapnil Joshi for Ashok Saraf | "जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही!", स्वप्नील जोशीची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

"जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही!", स्वप्नील जोशीची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या पुरस्काराची घोषणा केली. सध्या सर्व स्तरावरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीनेदेखील अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्वप्नील जोशीने अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, सिने जगत ज्या माणसाशिवाय अपूर्ण आहे! “सुपरस्टार” ही उपमा ज्यांना खऱ्या अर्थाने लागू होते! जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही! त्यांना पुरस्कार जाहीर झला, आणि प्रत्येक मराठी माणसाला आपला वैयक्तिक गौरव झाल्या सारखं वाटलं! “महाराष्ट्र भूषण” श्री.अशोक सराफ !!!! आपल्या सगळ्यांचे लाडके “अशोकमामा” !!!

स्वप्नीलने पुढे म्हटले की, तुमच्या आपुलकी आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. अनेक दशकांपासून तुम्ही आमच्या चेहऱ्यावर जे हसू आणले त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यावर आमचे प्रेम आहे! 

मुख्यमंत्र्यांनी केलं अशोक सराफ यांचं अभिनंदन
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी नुकतीच केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनदेखील केले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, "अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: "The Bigger artist, the Simpler the Man…Yes, Still!", Special Post by Swapnil Joshi for Ashok Saraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.