'दि एआय धर्मा स्टोरी' सिनेमा पुष्कर जोगला वाटतो जवळचा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:58 PM2024-10-22T17:58:52+5:302024-10-22T17:59:40+5:30

The AI Dharma Story : 'दि एआय धर्मा स्टोरी'मध्ये एक वडील आपल्या मुलीच्या जीवासाठी कसे लढा देतात, हे दाखवण्यात आले आहे.

The movie 'The AI Dharma Story' feels close to Pushkar Jog, said... | 'दि एआय धर्मा स्टोरी' सिनेमा पुष्कर जोगला वाटतो जवळचा, म्हणाला...

'दि एआय धर्मा स्टोरी' सिनेमा पुष्कर जोगला वाटतो जवळचा, म्हणाला...

पुष्कर सुरेखा जोग (Pushkar Jog) दिग्दर्शित ‘दि एआय धर्मा स्टोरी’ (The AI Dharma Story) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक थरारक चित्रपट असून आजच्या काळातील विदारक सत्य यात दाखवण्यात आले आहे. मराठीत हा विषय कधीच हाताळण्यात आलेला नसल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची विशेष उत्सुकता आहे. हा चित्रपट पुष्कर जोग काही कारणांनी स्वतःशी रिलेट करतो. याबाबतचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. 

पुष्कर जोगने सांगितले की, ''आज समाजात डीप फेकचे प्रमाण फोफावतेय. मी स्वतः एका मुलीचा वडील असल्याने माझ्याही मनात तिच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा कायम असतो. माझ्यासाठी माझ्या मुलीचा जीव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा मी स्वतःशी जोडू शकतो. चित्रपटात धर्माची व्यक्तिरेखा साकारताना, मी स्वतःच्या भावना त्यात ओतल्या आहेत. एक वडील आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी काय करू शकतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एक थरारक अनुभव देईल, तसेच एक वडील मुलीची भावनिक नातेही या निमित्ताने अनुभवयाला मिळेल.'' 


‘दि एआय धर्मा स्टोरी’मध्ये एक वडील आपल्या मुलीच्या जीवासाठी कसे लढा देतात, हे दाखवण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या तंत्रज्ञानाचे चांगले-वाईट परिणाम दाखवत हा चित्रपट एका भावनिक प्रवासाची गोष्ट सांगतो. पुष्करने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून स्मिता गोंदकर, दीप्ती लेले याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. बियु प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या असून येत्या २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The movie 'The AI Dharma Story' feels close to Pushkar Jog, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.