लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे वडील आजही करतात सायकलने प्रवास; लेकानेच सांगितली सत्य परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 04:00 PM2024-06-13T16:00:54+5:302024-06-13T16:01:54+5:30

Marathi actor: आजवरच्या कारकिर्दीत या अभिनेत्याने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. मात्र, त्याचे वडील आज सुद्धा सायकलनेच प्रवास करतात.

The popular Marathi actor's father still travels by bicycle | लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे वडील आजही करतात सायकलने प्रवास; लेकानेच सांगितली सत्य परिस्थिती

लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे वडील आजही करतात सायकलने प्रवास; लेकानेच सांगितली सत्य परिस्थिती

मराठी कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रसिद्ध, यश, संपत्ती सारं काही पाहिलं आणि त्यांच्या वाट्याला ती लक्झरी लाइफस्टाइल आली सुद्धा आहे. मात्र, स्टारडम आणि लक्झरी लाइफस्टाइल जगण्यापेक्षा ही कलाकार मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय आजही साधेपणाने राहणं पसंद करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या वडिलांची चर्चा रंगली आहे.

लेक लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही ते आज सुद्धा चक्क सायकलवरुन कामाला जातात. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती अभिनेता प्रथमेश परब याच्या वडिलांची. अलिकडेच प्रथमेशने 'रेड एफएम मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याची सायकलची आठवण सांगितली. 

"माझी सायकल बरोबरची आठवण म्हणजे माझे बाबा अजूनही सायकलवरच कामावर जातात. त्यामुळे अजूनही ते फिट आहेत. मला जेव्हा सायकलिंग शिकायची होती त्यावेळी मी बाबांकडूनच शिकलो. धडपडत, पडत शिकलो. पण एकाचं शिकलो. मी शाळेतही सायकलवरच जायचो", असं प्रथमेशने सांगितलं. सोबतच त्याने एक आवाहनदेखील केलं.

पुढे तो म्हणतो, "असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत जातांना अडचण येते किंवा ते लांब राहतात. पण त्यांना शिकायचं असतं, मोठं व्हायचं असतं. त्यामुळे जर त्यांना आपण सायकल उपलब्ध करु शकलो तर तुमच्याकडे असलेली जुनी किंवा नवीन सायकल खरेदी करुनही अशा मुलांना देऊ शकता." प्रथमेशने या व्हिडीओमध्ये या सायकल कोणाकडे डोनेट करु शकता याचीही माहिती दिली आहे.

दरम्यान, प्रथमेश मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने क्षितीजा घोसाळकर हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. प्रथमेश मराठी कलाविश्वात सक्रीय असून त्याने टाइमपास, बीपी, टकाटक, डिलिव्हरी बॉय, डार्लिंग, 35% काठावर पास, बालक-पालक, उर्फी अशा कितीतरी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: The popular Marathi actor's father still travels by bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.