नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:20 PM2022-12-31T18:20:27+5:302022-12-31T18:21:13+5:30

सैराट, नाळ, फॅन्ड्री आणि झुंड या चित्रपटानंतर नागराज मंजुळे लवकरच वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.

The shooting of Nagraj Manjule's 'Ghar Banduk Biryani' has been completed | नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण

नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिर्याणी'चं शूटिंग झालं पूर्ण

googlenewsNext

सैराट, नाळ, फॅन्ड्री आणि झुंड या चित्रपटानंतर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) लवकरच वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे 'घर बंदूक बिर्याणी' (Ghar Banuk Biryani). काही दिवसांपूर्वी झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात पूर्ण झाले असून आता लवकरच 'घर बंदूक बिर्याणी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या नवीन वर्षात ‘घर बंदुक बिर्याणी’ प्रदर्शित होणार आहे.  एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.


या चित्रपटाबद्दल निर्माते नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओसोबत याआधी सुद्धा मी काम केले आहे. झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव अनोखा असतो. नुकतेच आमचे ‘घर बंदुक बिर्याणी’चे चित्रीकरण संपले असून एका बाजूला काम पूर्ण झाल्याचे समाधानही आहे आणि इतके दिवस एकत्र राहिल्याने थोडा भावनिकही झालो आहे. यात मी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. सयाजी शिंदे सारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करताना मजा आली. आकाशसोबत मी याआधीही काम केले असून तो एक उत्तम कलाकार आहे. एखादी भूमिका साकारताना तो त्यात स्वतःला झोकून देतो. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच आम्ही प्रदर्शनाची तारीखही जाहीर करू.’’

Web Title: The shooting of Nagraj Manjule's 'Ghar Banduk Biryani' has been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.