कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' टीमने लढवली अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:42 PM2023-10-25T13:42:13+5:302023-10-25T13:42:30+5:30

बालगंधर्वांच्या संगीत नाटकावेळी प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत अत्तर लावून केले जायचे. त्याच धर्तीवर आता अक्षया नाईक व अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी"या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे.

the team 'Chukbhul Dhyavi Ghyavi' a unique idea on the occasion of Kojagari | कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' टीमने लढवली अनोखी शक्कल

कोजागरीनिमित्त 'चुकभूल द्यावी घ्यावी' टीमने लढवली अनोखी शक्कल

बालगंधर्वांच्या संगीत नाटकावेळी प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत अत्तर लावून केले जायचे. त्याच धर्तीवर आता अक्षया नाईक व अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी"या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. कोजागरीनिमित्त २८ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना नाटकासोबत मसाला दुधाचा आस्वाद घेता येणार आहे.

वाईड अँगल एण्टरटेनमेंट निर्मित (केतकी प्रवीण कमळे) व भूमिका थिएटर प्रकाशित, दिलीप प्रभावळकर लिखित "चुकभूल द्यावी घ्यावी" गोड नात्यांची मिश्किल गोष्ट. ह्या नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत. 

प्रासंगिक आणि अस्सल विनोद असलेले नाटक "चूक भूल द्यावी घ्यावी"प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. अभिनय, नाटकाचे नेपथ्य प्रकाशयोजना संगीत तसेच दिग्दर्शन सगळ्यांच बाजूने नाटक सर्वोत्तम झाले असून  प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील ह्या नाटकाला मिळत आहे.त्यामुळे "चूक भूल द्यावी घ्यावी" म्हणत यंदाची कोजागीरी प्रेक्षकांच्या  साथीने साजरी करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद आणि दुधाचा आस्वाद घेऊन कोजागरी साजरी करता येणार आहे.
 

Web Title: the team 'Chukbhul Dhyavi Ghyavi' a unique idea on the occasion of Kojagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.