‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:48 IST2022-02-03T15:45:12+5:302022-02-03T15:48:16+5:30
Wedding Bless बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. पण सध्या मराठी सिनेमसृष्टीतील टाईमपास मधील एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे
सध्या लग्नाचा सिजन आहे. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. पण सध्या मराठी सिनेमसृष्टीतील टाईमपास मधील एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना... तुम्हाला टाईमपास मधलं ही पोरी साजूक तूपातली हे गाणं आठवतयं का... त्यात मराठीमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर हीने तिच्या डान्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. शिबानी आता लवकरच बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर सोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. २१ फेब्रुवारीला शिबानी-फरहान कोर्ट मॅरेज करणार असून एप्रिलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं समोर आलयं. याची अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र शिबानी-फरहान यांचे चाहते मात्र ही बातमी ऐकून आनंदी झाले आहेत.
फरहान आणि शिबानी बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेजण एकमेकांसोबत फिरताना, एकत्रितपणे सुट्ट्या घालवताना अनेकदा दिसून आलेत. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरत होते. बॉलिवूडमधील ही सर्वांत चर्चीत जोडी आहे. पण आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.