"लग्नात स्पेस पाहिजे नाहीतर...", अभिनेत्री अमृता सुभाष पती पत्नीच्या नात्यावर स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:56 IST2025-02-24T11:55:23+5:302025-02-24T11:56:01+5:30
Actress Amruta Subhash :नुकतेच एका मुलाखतीत अमृता सुभाष हिने पती पत्नीच्या नात्यावर भाष्य केले.

"लग्नात स्पेस पाहिजे नाहीतर...", अभिनेत्री अमृता सुभाष पती पत्नीच्या नात्यावर स्पष्टच बोलली
अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी कलाविश्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाषचं नाव घेतलं जातं. मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज अशा सर्व माध्यमांमध्ये तिनं काम केलं आहे. नुकतेच एका मुलाखतीत अमृता सुभाष हिने पती पत्नीच्या नात्यावर भाष्य केले.
अमृता सुभाष हिने आरपार या युट्यूब चॅनेलमध्ये मुग्धा गोडबोलेच्या वुमन की बात या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने पती-पतीच्या नात्यावर बोलताना म्हटले की, लग्नात ती स्पेस पाहिजे, असे मला वाटते. प्रत्येक गोष्ट मी तुला सांगायची, तू मला सांगायचीये थोडी स्पेस पाहिजे. ती निर्माण करणं पण थेरेपीतून नाहीतर मग गुदमरणं पण एखाद्या नात्यात येऊ शकतं असं मला वाटतं.
म्हणून त्याला ओरडणं हा बेजबाबदारपणा आहे...
ती पुढे म्हणाली की, सगळं मी तुला सांगणार आणि आता माझे सगळे प्रश्न तू सोडव. दडपण येतं त्या माणसावर म्हणजे एक काळ असा होता जेव्हा मी सतराव्या वर्षी त्याच्या प्रेमात पडले तेव्हा अर्थातच माझी त्याच्याकडून ती अपेक्षा होती. ते पझेशन पण मला होतं त्याच्याविषयी की अरे हे यार आता तू सोडव ना आता माझं सगळं म्हणजे मला लक्षात आले नाही. हे माझे आयुष्य आहे ना ते त्याचं आयुष्य आहे. आणि माझ्या आयुष्यातलं हे सोडवायला जर मला मदत हवी असेल तर मी ते घ्यायची. तो ते का सोडवत नाही म्हणून त्याला ओरडणं हा बेजबाबदारपणा आहे. हे मला कळत गेलं आणि तो बेजबाबदारपणा अनेक नात्यांचा इतका अविभाज्य भाग झालाय सध्या की माझा नवरा ते करत नाही असं म्हणूनही तक्रारीने तुला सांगणार नाही. पण ते वाटतं साहजिक आहे. पण कुठेतरी त्याच्या पलिकडे आपल्याला जावं लागेल एका समजुती पाशी यायचं असेल तर.