चित्रपटात भेदभाव नसतो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:17+5:302016-02-12T02:28:32+5:30
अनुदान मिळते हे पाहून अनेकदा चित्रपट तयार केले जातात. त्यात आता अनुदानाची योजना अजूनच लवचिक करण्यात आली आहे. त्यामुळे ...
अ ुदान मिळते हे पाहून अनेकदा चित्रपट तयार केले जातात. त्यात आता अनुदानाची योजना अजूनच लवचिक करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट करू इच्छिणाऱ्याना प्रोत्साहन मिळत आहे. या अनुदानाचा लाभ घेऊन वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार करता येऊ शकतात.
मराठीची स्पर्धा इतर भाषिक चित्रपटांशी
मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत, थिएटर्स मिळाली तर प्राईम टाईम मिळत नाही अशी सध्याची अवस्था आहे. पण यामध्ये मराठी चित्रपटांची स्पर्धा आपापसांत नसून ती हिंदी, तमिळ आणि इंग्लिश या इतर भाषिक चित्रपटांशी आहे. आज वर्षाला १00 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण त्यातील ५0 चित्रपटच प्रेक्षकांना पसंत पडतात. यासाठी निर्मात्यांनीच एकत्र येऊन समन्वयाने चित्रपटांच्या रिलीज डेट ठरवल्या पाहिजेत. तरच प्रेक्षकांना सर्व चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. चित्रपट कलात्मक असो वा व्यावसायिक, हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे. कलात्मक चित्रपटांना गर्दी कमी होते, हे मान्य केलं तरी ते गर्दी खेचण्याचं काम करू शकतात ही देखील सत्य परिस्थिती आहे.
कारण 'फँड्री' आणि 'ख्वाडा' या चित्रपटांनी ते साध्य करून दाखवलं आहे. मला असं वाटतं, की कोणत्याही कथेकडे पाहण्याचा दिग्दर्शकाचा एक वेगळा दृष्टीकोन असतो. पूर्वी व्यावसायिक चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग ठरलेला असायाचा. मात्र आता विषय, आशय आणि मांडणी चांगली असेल तर प्रेक्षक हा चित्रपट शहरी आहे की ग्रामीण हे पाहात नाही. इतकेच नाही तर दिग्दर्शकाची मांडणी, चित्रपटाचा विषय, तो मांडण्याची पद्धत प्रेक्षकांमध्ये परिवर्तन घडवून आणते आहे. त्यामुळे मी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद मानत नाही. खरं तरं मराठी चित्रपटांना आता सुगीचे दिवस आले आहेत, असं मला वाटतं. भाऊराव कर्हाडे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील शिरगोंडा या दुष्काळग्रस्त गावातील.
गावात एकीकडे पाण्यासाठी, अन्नासाठी लोकांना वणवण भटकावे लागत असताना ही व्यक्ती काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे स्वप्न पाहात होती आणि वेगळे म्हणजे तरी काय तर, एखादा बिझनेस, मोठय़ा कंपनीत नोकरी असलं काही नाही बरं.. तर एक चित्रपट तयार करण्याच्या स्वप्नाने भाऊरावांना वेडे केले होते आणि या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपली शेतजमीन तब्बल ८५ लाख रुपयांना विकली आणि चित्रपट तयार करण्यासाठी पैसे उभे केले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने त्यांना कित्येकदा शूटिंग थांबवावेही लागले. पण चित्रपट न करताच सोडतील ते भाऊराव कसले..?
चित्रपट पूर्ण झाल्यावरही तो प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या चित्रपटाच्या 'ख्वाडा' या नावाप्रमाणेच तो तयार करतानाही त्यांना ख्वाडा या शब्दाची प्रचिती आली. पण या सगळ्या अडथळ्यांना तोंड देत भाऊराव कर्हाडेंनी त्यांचे हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलेच. भाऊरावांच्या या चित्रपटावर प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक पुरस्कारांनी मोहोर उमटवली. ६२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्पेशल ज्युरी प्राईज आणि बेस्ट ऑटोग्राफी या पुरस्कारांवर भाऊरावांच्या या पहिल्याच प्रयत्नातील चित्रपटाचे नाव कोरले गेले. आणि आता.. भाऊराव कर्हाडे तयारीला लागलेत ते त्यांच्या दुसर्या चित्रपटाच्या शूटिंगला. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी आलेले अनुभव त्यांनी सीएनएक्स 'सेलिब्रिटी रिपोर्टर' म्हणून शेअर केले.