​ये रे ये रे पैसा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 07:23 AM2018-02-01T07:23:37+5:302018-02-01T12:53:37+5:30

ये रे ये रे पैसा हा यावर्षी प्रदर्शित झालेला संजय जाधव दिग्दर्शित पहिला सुपरहिट मराठी चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ ...

These ray ray money films have earned a lot of money on the box office | ​ये रे ये रे पैसा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

​ये रे ये रे पैसा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

googlenewsNext
रे ये रे पैसा हा यावर्षी प्रदर्शित झालेला संजय जाधव दिग्दर्शित पहिला सुपरहिट मराठी चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपट सुद्धा गेल्या काही वर्षात कथा आणि उत्तम अभिनय याची सांगड घालत बॉक्स ऑफिस वर कमाल करत असल्याचे आपण पाहिले आहे. साधारणपणे मराठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यात १०० हून अधिक थिएटर्सचे ओपनिंग मिळते. परंतु ये रे ये रे पैसा हा  चित्रपट पद्मावत सारख्या चर्चित आणि बिग बजेट चित्रपटासमोर देखील चौथ्या आठवड्यात १२५ थिएटर्समध्ये यशस्वीरीत्या चालत आहे. मराठी प्रेक्षकांनी  नेहमीच मराठी चित्रपटांना उचलून धरल्याचे आपण पहिले आहे. संजय जाधव दिग्दर्शित या फुल्टू मॅड कॉमेडी एन्टरटेन्मेंट चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. पद्मावत सारखा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत असताना प्रेक्षक ये रे ये रे पैसाला देखील चांगले कलेक्शन मिळवून देत आहेत. 
ये रे ये रे पैसा या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर काहीच दिवसांपूर्वी टीमने केक कापून सेलिब्रेशनही केले होते. ये रे ये रे पैसा चित्रपटांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. ये रे ये रे पैसाच्या टीमने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती आणि चित्रपटाच्या स्टारकास्टने बिग बीं सोबत क्वॉलिटी टाइम घालवला. ये रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. गुरू या चित्रपटानंतर तब्बल दीड वर्षांनंतर संजय जाधव यांचा ये रे ये रे पैसा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. ये रे ये रे पैसा या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत.

Also Read : ​ये रे ये रे पैसा या चित्रपटातील एका दृश्यासाठी वापरण्यात आले ६० कॅमेरे

Web Title: These ray ray money films have earned a lot of money on the box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.