'छावा'मधील रायाजींच्या खऱ्या आयुष्यात आहेत 'या' दोन व्यक्ती महत्त्वाच्या, म्हणाला - "जगातील सर्व पुरुषांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:49 IST2025-03-08T12:48:13+5:302025-03-08T12:49:58+5:30
Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.

'छावा'मधील रायाजींच्या खऱ्या आयुष्यात आहेत 'या' दोन व्यक्ती महत्त्वाच्या, म्हणाला - "जगातील सर्व पुरुषांना..."
१४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांचा सिनेमा 'छावा'ची (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम आहे. हा चित्रपट एकानंतर एक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. शिवाजी सावंत यांची प्रसिद्ध कादंबरी छावावर हा सिनेमा आधारीत आहे. या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. त्याने या सिनेमात रायाजी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुक होताना दिसत आहे. या सिनेमामुळे तो सातत्याने चर्चेत येत आहे. दरम्यान अभिनेता संतोष जुवेकरने जागतिक महिला दिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल सांगितले आहे.
संतोष जुवेकरने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझ्या आयुष्यातल्या दोन अतिशय महत्वाच्या व्यक्ती. आई आणि मधुरा तुम्हाला हॅप्पी वुमन्स डे. एक घरासकट आम्हालाही सांभाळते आणि एक घरासकट आम्हांला एकत्र तिच्या प्रेमात बांधून ठेवते. तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं कमीच असेल कायम माझ्यासाठी. तुम्ही कायम खुश आनंदी आणि सुखरूप रहावं हीच इच्छा बाकी सब में कमालुंगा. जगातील सर्व पुरुषांना त्यांच्या घरातल्या आणि समाजातल्या सर्व स्त्रियांचा मान सन्मान करण्याची सु्बुद्धी आणि त्यांची कायम सुरक्षा करण्याचे बळ परमेश्वर देओ हीच त्याच्या चरणी प्रार्थना. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याशिवाय दिव्या दत्ता, डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, १३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या छावाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात ८४०५ कोटींची कमाई केली असून, त्यानंतर भारतात चित्रपटाचे कलेक्शन ४९२.०५ कोटी रुपये झाले आहे. जगभरातील संकलन ६६५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.