पुष्पा फिव्हर ! साऊथची ही अभिनेत्री करणार थेट मराठीत एन्ट्री, नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:27 PM2022-01-28T16:27:09+5:302022-01-28T16:33:50+5:30

साऊथ इंडस्ट्री(South Indian Actors)मधील बरेच स्टार्स हिंदीत डेब्यू करण्यासाठी सज्ज झालेत. साऊथची ही अभिनेत्री मात्र मराठीत पदार्पण करेतय.

This actress from the South will make a direct entry in marathi industry | पुष्पा फिव्हर ! साऊथची ही अभिनेत्री करणार थेट मराठीत एन्ट्री, नाव वाचून व्हाल थक्क

पुष्पा फिव्हर ! साऊथची ही अभिनेत्री करणार थेट मराठीत एन्ट्री, नाव वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

 महेश टिळेकर आणि विजय शिंदे यांचा हवाहवाई सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून द ग्रेट इंडियन किचन' (The great indian kitchen) या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan ) मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 


 "द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्याने महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.  अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या आधीच्या  चित्रपटांमधून मराठीत पदार्पण केलं होतं. त्याशिवाय "बाहुबली" या चित्रपटाचे कॅमेरामन सेन्थील कुमार यांना पहिली संधी महेश टिळेकर यांनी त्यांच्या "आधार" चित्रपटाद्वारे दिली होती. "द ग्रेट इंडियन किचन" या चित्रपटासह निमिषाच्या नायट्टू, मालिक या चित्रपटांतील अभिनयाचं देखील  कौतुक झालं आहे. 

वेगळे विषय आणि कलाकारांच्या सहज अभिनयामुळे मल्याळम चित्रपटांचा देशात आणि परदेशातही प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. निमिषाचा बहुचर्चित 'द ग्रेट इंडियन किचन" हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनीही आवर्जून पाहिलेला आहे.  "हवाहवाई" या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं  निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं असं  महेश टिळेकर यांनी सांगितलं.साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून  सुरू केला आहे .निमिष सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात  भूमिका असून अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ८८ व्या वर्षी "हवाहवाई" चित्रपटातील एक गाणं गायलं आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निमिषा सजयनसारखी सशक्त अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत असल्यानं या चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे. मात्र त्यासाठी प्रेक्षकांना १ एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे. 

Web Title: This actress from the South will make a direct entry in marathi industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.