अभिनेता सिद्धार्थ जाधवसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री गिरवतेय मराठीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:06 PM2022-11-29T16:06:43+5:302022-11-29T16:07:09+5:30

Siddhath Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी सोबतच हिंदीतही चांगला सक्रिय आहे. तो सध्या एकाच वेळी दोन चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

This Bollywood actress is taking Marathi lessons with actor Siddharth Jadhav | अभिनेता सिद्धार्थ जाधवसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री गिरवतेय मराठीचे धडे

अभिनेता सिद्धार्थ जाधवसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री गिरवतेय मराठीचे धडे

googlenewsNext

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या मराठी सोबतच हिंदीतही चांगला सक्रिय आहे. तो सध्या एकाच वेळी दोन चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यापैकी त्याचा मराठी फिल्म 'बालभारती' (Balbharati) या आठवड्यात रिलीज होतेय, तर रोहित शेट्टीसोबतची 'सर्कस' (Circus) प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या दोन्ही सिनेमाच्या प्रमोशनसाठी बनवलेल्या एका व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव चक्क जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez )ला मराठीचे धडे देताना दिसतो आहे.

सिद्धार्थ जाधवने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धूच्या मागे जॅकलिन मराठी बोलत आहे. तिने प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. जॅकलिन आणि सिद्धार्थ जाधव 'सर्कस'मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग, विजय पाटकर, मुकेश तिवारी, संजय मिश्रा असे बरेच कलाकार आहेत. हा चित्रपट १९८२ साली रिलीज झालेल्या ‘अंगूर’ चित्रपटाचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे. अजय देवगण या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे. 


कोरोना काळात चित्रपटगृह बंद असल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. मात्र आता चित्रपट २३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की पुन्हा एकदा तो रणवीरबरोबर धमाल करताना दिसणार आहे.

Web Title: This Bollywood actress is taking Marathi lessons with actor Siddharth Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.