'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 07:00 AM2022-12-21T07:00:00+5:302022-12-21T07:00:00+5:30

Ved Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित वेड हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

This famous child actor will appear in the movie 'Ved', know about her | 'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल

'वेड' चित्रपटात झळकणार ही प्रसिद्ध बालकलाकार, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनित वेड (Ved Marathi Movie) हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. वेड चित्रपटातील या गाण्यात सलमान खान रितेश सोबत झळकणार आहे. या अगोदर तो लई भारी चित्रपटात देखील एका गाण्यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. वेड चित्रपटात मीराची भूमिका प्रसिद्ध बालकलाकार खुशी हजारे हिने साकारली आहे. 

वेड हा मराठी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट मजिलीवर आधारित असल्याचे बोलले जात होते. याबद्दल रितेशला पत्रकार परिषदेत विचारण्यात आले तेव्हा त्याने हा चित्रपट मजीलीवर आधारित असल्याने कबूल केले. मात्र वेड चित्रपटात तुम्हाला आणखी काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील असेही त्याने स्पष्ट केले. मजिली हा नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभूची भूमिका असलेला चित्रपट आहे. वेड चित्रपट याच कथेवर आधारित आहे. 

वेड चित्रपटात मीराची भूमिका खुशी हजारे हिने साकारली आहे. खुशी हजारे ही बालकलाकार असून तिने काही नामवंत जाहिरातींसाठी काम केले आहे. हिंदी चित्रपटातून खुशीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. ऐश्वर्या रायसोबत तिने २०१६ सालच्या सरबजीत या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते.

विकी कौशल सोबत भूत या हॉरर चित्रपटातही ती झळकली होती. तर जान्हवी कपूरच्या मिली चित्रपटातही ती एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. २०२० सालच्या प्रवास या चित्रपटातून खुशीने मराठी सिनेइंडस्ट्रीत देखील पाऊल टाकले. नुकत्याच येऊन गेलेल्या आपडी थापडी या चित्रपटात ती श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेच्या मुलीची भूमिका साकारताना दिसली होती. वेड हा खुशीने अभिनित केलेला तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून तिच्या येण्यामुळे कथानकात ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.

Web Title: This famous child actor will appear in the movie 'Ved', know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.