'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूचा असा झाला शेवट, अभिनेत्याच्या मृत्यूआधी घडलेल्या या घटनेची पत्नीला आजही वाटते खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:43 AM2023-04-29T11:43:47+5:302023-04-29T11:44:32+5:30

Siddharth Ray : 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'बाजीगर' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ रेचे २००४ साली निधन झाले.

This is how Shantanu ended in 'Ashi Hi Banavabanvi', his wife still regrets the incident that happened before the actor's death. | 'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूचा असा झाला शेवट, अभिनेत्याच्या मृत्यूआधी घडलेल्या या घटनेची पत्नीला आजही वाटते खंत

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूचा असा झाला शेवट, अभिनेत्याच्या मृत्यूआधी घडलेल्या या घटनेची पत्नीला आजही वाटते खंत

googlenewsNext

'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'बाजीगर' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ रे(Siddharth Ray)चे २००४ साली निधन झाले. वयाच्या ४१व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याची पत्नी अभिनेत्री शांतीप्रिया (Shantipriya) एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती. शांतीप्रियाने वयाच्या १९ व्या वर्षी अक्षय कुमारसोबत 'सौगंध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने सिद्धार्थ रेसोबतही बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले होते. यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली, मात्र लग्नानंतर काहीच वर्षांनी अभिनेत्याचे निधन झाले. नवऱ्याच्या निधनानंतर तिने एकट्याने मुलांचा सांभाळ केला. दरम्यान अभिनेत्रीने अलीकडेच सिद्धार्थ यांच्यासोबत पळून जाऊन केलेल्या लग्नाविषयी आणि सिद्धार्थ यांच्या अचानक सोडून जाण्याविषयी खुलासा केला आहे.

अक्षय कुमार, सिद्धार्थ रे आणि शांतीप्रिया यांनी 'द्वारपाल' नावाचा चित्रपट साइन केला होता. त्या दरम्यान शांतीप्रिया आणि सिद्धार्थची भेट झाली. १९९२ या साली झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्व नवीन कलाकारांनी परफॉर्म केला होता, त्यात शांतीप्रिया आणि सिद्धार्थने एकत्र डान्स केलेला. त्यावेळी प्रॅक्टिसदरम्यान शांतीप्रिया यांची भेट वारंवार सिद्धार्थ यांच्याशी होत असे. ती म्हणाली की, की दाक्षिणात्य लोकांसाठी व्ही. शांताराम एखाद्या देवाप्रमाणे होते. त्यामुळे त्यांच्या नातवासोबत परफॉर्म करणे तिच्यासाठी मोठी गोष्ट होती. त्या दोघांमध्ये शांताराम यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चादेखील होत असे. 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत शांतिप्रियाने खुलासा केला.

त्यानंतर सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांनी 'द्वारपाल' आणि त्यानंतर 'अंधा इंतकाम' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातली जवळीक वाढली. अभिनेत्रीने अशी माहिती दिली की एके दिवशी सिद्धार्थने कोणतीही भीती न बाळगता तिच्या आईकडे शांतीप्रियाचा हात मागितला. त्या दोघांमध्ये याविषयी बोलणे होत असे, पण सिद्धार्थ यांनी लग्नाबाबत थेट तिच्या आईलाच विचारल्यामुळे शांतीप्रियालाही आश्चर्य वाटले होते. शांतीप्रिया म्हणाली की त्यावेळी त्याचे करिअर यशाच्या शिखरावर होते. सिद्धार्थची लग्नाची मागणी तिच्या आईसाठीही धक्कादायक होती.

शांतीप्रियाच्या आईने असेही म्हटले की अभिनेत्रीचा भाऊच सर्व निर्णय घेतो, त्यामुळे तुम्हाला त्याला विचारावे लागेल. सिद्धार्थच्या भावासह शांतीप्रियाच्या भावाला भेटण्यासाठी चेन्नईलाही पोहोचला. मात्र अभिनेत्रीच्या आईने आधीच तिच्या भावाला नकार द्यायला सांगितला. शांतीप्रियाच्या भावानेही नम्रपणे सिद्धार्थला सांगितले की तिचे करिअर आताच सुरू झाले आहे, तुमचीही भेट आताच झालीये त्यामुळे थोडा वेळ या नात्याला द्या. आपण एक-दोन वर्षांनी यावर विचार करू. मात्र सिद्धार्थ आणि त्याचा भाऊ तिथून निघून गेल्यानंतर आईने शांतीप्रियाच्या सेक्रेटरीला सांगितले की सिद्धार्थ आणि शांतीप्रियाचे एकत्र चित्रपट रद्द करून टाका.

सिद्धार्थ रे आणि शांतीप्रिया यांची लव्हस्टोरी मात्र फुलतच होती, ती पत्रांद्वारे एकमेकांशी संभाषण करायचे. त्यावेळी त्या उटीवरुन अभिनेत्याला पत्र पाठवायच्या. अजूनही ती पत्र त्यांच्याकडे आहेत. फोनवर त्यांचे बोलणे क्वचित व्हायचे. मात्र आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता, कारण त्यांची ओळख फक्त वर्षभराची होती. शिवाय शांतीप्रिया यांचे करिअरही खूप उत्तम चालले होते. आईसमोर फोनवर बोलताना शांतीप्रिया यांनी अभिनय करावा लागायचाय

शांतीप्रियाने या मुलाखतीमध्ये सांगितले की तिची आई प्रत्येक शूटिंगदरम्यान तिच्यासोबत असायची. १९९२ सालातील ही गोष्ट आहे. जिथे शूटिंग असेल तिथे आई तिच्यासोबत प्रवास करायची. मात्र एकावेळी असे झाले की, शांतीप्रियाच्या भावाचे ऑपरेशन होते. त्यामुळे तिच्या आईला चेन्नईत थांबावे लागले आणि शांतीप्रिया एकट्याच शूटिंगसाठी आल्या. त्यावेळी सिद्धार्थ आणि शांतीप्रियाने पळून जाऊन लग्न केले. सिद्धार्थच्या आईवडिलांची या लग्नाला परवानगी होती, त्याच्या घरातील सर्वांची मंजुरी होती. शांतीप्रिया म्हणतात की आजही त्या सुनेचे कर्तव्य पार पाडत आहेत. तसेच मुलांचा विचार केल्यामुळे दुसऱ्या लग्नाचा विचार कधी केला नाही.

या मुलाखतीत शांतीप्रियाने सिद्धार्थ रेच्या निधनाविषयी भाष्य केले. ती म्हणाली की, त्या दिवशी त्या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झालेला आणि त्यामुळे आम्ही भांडत होतो. घरी परतल्यानंतर तो बाहेरच्या खोलीत होता तर शांतीप्रिया बेडरुममध्ये होती. सिद्धार्थने शांतीप्रियाला बाहेर येण्यास सांगितले, त्याला काहीतरी बोलायचे होते. मात्र अभिनेत्रीने नकार दिला. सिद्धार्थ तेव्हा त्याच्या चार वर्षीय धाकट्या मुलाशी बोलत राहिला. सिद्धार्थ त्याच्या मुलाशी बोलताना म्हणाला की, आता ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होऊन नवा व्यवसाय सुरू करायचा आहे. मी तुझ्या वाढदिवसाला इकडे असणार नाही. शांतीप्रिया म्हणाली की सिद्धार्थचे निधन ८ मार्च रोजी झाले, तर त्याच्या मुलाचा वाढदिवस १२ मार्चला असतो. त्याचा जेवता जेवताच मृत्यू झाला. अभिनेत्री म्हणाली की मुलांना सांगतात की ती सल कायम आहे की, त्या रात्री सिद्धार्थ यांना नेमके काय सांगायचे होते. 

Web Title: This is how Shantanu ended in 'Ashi Hi Banavabanvi', his wife still regrets the incident that happened before the actor's death.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.