असा सुचला 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हा लोकप्रिय डायलॉग, भन्नाट किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले- "हातातला पाइप ओढताना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:45 PM2024-08-30T15:45:50+5:302024-08-30T15:46:20+5:30

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी 'धुमधडाका' चित्रपटातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचे पात्र साकारले होते. हे पात्र आठवले की ओठावर येतो तो वख्या विक्खी वुक्खू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग.

This is how the popular dialogue 'Vakkhya Vikkhi Vukkhu' was suggested, Ashok Saraf said while narrating an unusual anecdote - "While smoking a pipe in the hand..." | असा सुचला 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हा लोकप्रिय डायलॉग, भन्नाट किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले- "हातातला पाइप ओढताना..."

असा सुचला 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हा लोकप्रिय डायलॉग, भन्नाट किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले- "हातातला पाइप ओढताना..."

१९८५ साली 'धुमधडाका' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश कोठारे यांनी केली होती. या चित्रपटाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, शरद तळवलकर, प्रेमा किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.या चित्रपटातील एक डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता. हा डायलॉग म्हणजे 'वक्ख्या विक्खी वुख्खू'. हा डायलॉग अशोक सराफ यांनी म्हटला होता आणि तो खूप हिट झाला होता. या डायलॉगचा इंटरेस्टिंग किस्सा नुकताच एका मुलाखतीत अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी सांगितला. 
 
अशोक सराफ यांनी 'धुमधडाका' चित्रपटातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचे पात्र साकारले होते. हे पात्र आठवले की ओठावर येतो तो वख्या विक्खी वुक्खू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग. खरेतर हे शब्द स्क्रिप्टमध्ये नव्हतेच. पण ऐन शूटिंगच्यावेळी हा सीन सुरू असतानाच अशोक सराफ यांना ठसका लागला आणि हा आवाज त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली. पण दिग्दर्शक महेश कोठारे यांना त्या ठसक्यातच या चित्रपटाचा यूएसपी सापडला होता.

''...आणि प्रेक्षकांनाही भावलं''

महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत या डायलॉगचा किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले की, धूमधडाका सिनेमात श्रीमंत उद्योगपती म्हणून महेशचे वडील होऊन आल्यावर हातात असलेला पाइप ओढायचा होता. त्याची सवय नव्हती. त्यामुळे शूटिंगवेळी पाइप ओढल्यावर ठसका लागला आणि त्यातून ‘'वक्ख्या विक्खी वुख्खू' सुचले. ते त्या भूमिकेला इतके साजेसे वाटले, की प्रेक्षकांनाही भावले.

महेश कोठारेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट

'धुमधडाका' या चित्रपटाने ऐंशीच्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. महेश कोठारेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होता. यात अशोक सराफ यांच्याव्यतिरिक्त निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवलकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
 

Web Title: This is how the popular dialogue 'Vakkhya Vikkhi Vukkhu' was suggested, Ashok Saraf said while narrating an unusual anecdote - "While smoking a pipe in the hand..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.