या कारणामुळे सई ताम्हणकरने केलेला 'बाबूरावला पकडा' सिनेमा, म्हणते - "मला कोणताही पश्चाताप नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:02 IST2025-02-19T18:01:40+5:302025-02-19T18:02:39+5:30
Saie Tamhankar : सुरुवातीच्या काळात सईने अशा बऱ्याच सिनेमात काम केले, जे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही. मात्र तिला याबाबत कोणताही पश्चाताप वाटत नाही.

या कारणामुळे सई ताम्हणकरने केलेला 'बाबूरावला पकडा' सिनेमा, म्हणते - "मला कोणताही पश्चाताप नाही..."
सई ताम्हणकर(Saie Tamhankar)ने हिंदी आणि मराठी कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात सईने अशा बऱ्याच सिनेमात काम केले, जे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही. मात्र तिला याबाबत कोणताही पश्चाताप वाटत नाही. याबद्दल सईने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. यावेळी तिने 'बाबूरावला पकडा' या सिनेमा कोणत्या कारणामुळे स्वीकारला, याबद्दल सांगितले.
सई ताम्हणकरने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मला नाही वाटत मी असे कुठले सिनेमे केलेत ज्यांनी मला वाटले की अरे चुकलेच म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'बाबूरावला पकडा' नावाचा सिनेमा मी केला होता. तर आता ह्याच्या दोन बाजू आहेत की टायटलमध्ये सुद्धा गडबड आहे आणि पिक्चर सुद्धा एवरेज होता पण त्याच्यात माझा स्वार्थ काय होता मी पहिल्यांदा भारताबाहेर प्रवास करत होते. त्यामुळे मला याबाबत कोणताही पश्चाताप नाही.
सई पुढे म्हणाली की, मी पहिल्यांदा बँकॉकला ट्रॅव्हल केले होते आणि १९ दिवसाचं शेड्यूल होते. हा माझा त्याच्यामध्ये स्वार्थ होता. असं कधीच नसतं की आपले निर्णय पूर्णच आपल्याला माहीत असतात. आपण का हा सिनेमा करतोय. एक काहीतरी गोष्ट असते जी कलाकार नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो आणि मला असं वाटतं ते कारण आपल्याला माहीत असतं ते स्वीकारुन आपण पुढे जातो. त्यामुळे मला याबाबत कधीच पश्चाताप किंवा चूक केली असं वाटत नाही.