फोटोत दिसणारा हा चिमुकला आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, त्याची आई आणि पत्नी देखील आहेत अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:00 AM2023-03-31T07:00:00+5:302023-03-31T07:00:10+5:30

फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याने आईच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

This little boy seen in the photo is today a famous actor in the marathi industry his mother and wife is also an actress | फोटोत दिसणारा हा चिमुकला आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, त्याची आई आणि पत्नी देखील आहेत अभिनेत्री

फोटोत दिसणारा हा चिमुकला आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, त्याची आई आणि पत्नी देखील आहेत अभिनेत्री

googlenewsNext

बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. असाच एका सेलिब्रेटीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय. 

फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याने आईच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. इतक्या हिंट दिल्यानंतर तुम्हाला त्याचे नाव कळलंच असले, नसेल कळले तर आम्ही सांगतो. 

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून विराजस कुलकर्णी आहे. विराजसनं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. अनाथेमा या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसंच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.

विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळीसोबत लग्नगाठ बांधली आहे. शिवानी व विराजस दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची ओळख झाली होती. या नाटकाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली.

Web Title: This little boy seen in the photo is today a famous actor in the marathi industry his mother and wife is also an actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.