या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला स्वत:चा व्यवसाय, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 20:19 IST2023-04-07T20:15:58+5:302023-04-07T20:19:31+5:30

कलाविश्वाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आहेत.

This Maratha actor started his own business | या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला स्वत:चा व्यवसाय, जाणून घ्या याविषयी

या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला स्वत:चा व्यवसाय, जाणून घ्या याविषयी

अनेक कलाकार असे आहेत जे आता केवळ अभियन क्षेत्रातच नाही तर उत्पन्नाचं दुसरं माध्यम म्हणून वेगवेगळे व्यवसाय सुरू करत आहेत. स्वत:च्या व्यवसाय सुरू करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे अभिनेता आदित्य सातपुतेची. 

आदित्यने नुकतेच त्याचं स्वत:चा पुण्यात कॅफे टी डे' नावाचा चहाचा ब्रॅंड नुकताच लॉंच केला आहे. या ब्रॅंडचे उद्घाटन पुण्यात संपन्न झाले असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात या ब्रॅंडच्या दहा फ्रॅंचाइसी एकत्र सुरू होणार आहेत.

याआधी मराठीतील अभिनेता संग्राम साळवी, शंतनू मोघे, शशांक केतकर, प्रिया बेर्डे यांनी स्वतःचं हॉटेल तसेच कॅफे सुरू केले. प्रिया बेर्डे यांनी तर कोथरूड परिसरात ‘चख ले ‘ या नावाने हॉटेल सुरू केले आहे. 

आत्तापर्यंत अभिनेता आदित्य सातपुतेने हुरपरी, ट्रिंग ट्रिंग, फक्त बायको पाहिजे, लयं गुणाची हाय, रूप साजरं असे जवळपास २५ हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. त्यातले सर्वच म्युझिक अल्बम सुपरहिट झाले आहेत. त्याचा स्वतःचा A/7 स्टुडिओ नावाचा कपड्यांचा ब्रॅंड देखिल आहे. आदित्यचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
 

Web Title: This Maratha actor started his own business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.