'तू ही रे' मराठीसाठी 'मितवा!'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:38+5:302016-02-07T07:17:28+5:30
'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांना 'प्रेम', 'मैत्री' या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवलं. 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाने साधीशी गोष्ट पडद्यावर ...
' ;दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांना 'प्रेम', 'मैत्री' या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवलं. 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाने साधीशी गोष्ट पडद्यावर नजाकतीनं फुलविली. 'वेलकम जिंदगी'त आत्महत्येसारखा विषय हाताळताना प्रचंड संवेदनशीलतेनं त्यानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. 'तू ही रे'सारख्या चित्रपटातून विवाहाच्या पवित्रबंधनांना प्रेमाचे पाशही इजा पोहोचवू शकत नाहीत, हे दाखवलं. कथा वेगळ्या; पण स्वप्निल तोच; पण हे सगळं पाहताना स्वप्निलसारखा ताकदीचा अभिनेता एकाच इमेजच्या बेडीत जखडलाय असे वाटू लागलंय. ही इमेजची बेडी त्याने तोडावी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचे रंग भरून मराठी चित्रपटसृष्टी आणखी पुढे न्यावी, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवावा, यासाठी हा पत्रप्रपंच.. प्रिय स्वप्नील,
हॅपी बर्थ डे! तुझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्यापासून 'सोशल मीडिया'वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तुझी लोकप्रियता किती प्रचंड आहे, हे त्यातून समजतं..तुझ्यावर भरभरून लिहिलं जातंय.. तुझा सगळा प्रवास नव्यानं एकमेकांना सांगितला जातोय. त्याची उजळणी मी करणार नाही; पण तुझा सच्चा फॅन असल्यानं आज वाढदिवसाचं निमित्त साधून माझ्यासारख्या अनेकांच्या तुझ्याकडून किती अपेक्षा आहेत, हे सांगणं मला आवश्यक वाटतं.
स्वप्नील, आजचा तरुण (मुख्यत: तरुणी!) मराठी चित्रपट पाहायला लागले आहेत, मराठी माणूस थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपट पाहतोय याच्या श्रेयाचे वाटेकरी अनेक असतील; पण त्यातील सिंहाचा वाटा तुझा आहे.
'दुनियादारी' बघितला नाही, असा मराठी तरुण अद्यापपर्यंत माझ्या पाहण्यात नाही! मराठी चित्रपटाला तू फ्रेशनेस दिला. ग्लॅमर दिलं. अभिनय आणि संवादाची ताकद दाखविली.
हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी भव्य सेट, मालमसाला यांसारख्या विविध टेक्निकचा वापर केला जात असताना, तू केवळ आपल्या बोलण्याच्या जादूने मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 'दुनियादारी'मधला श्रेयस बोलण्याच्या जादूने आपल्या ग्रुपला खिळवून ठेवतो, तसाच प्रेक्षकांनाही खिळवून ठेवतो. बॉलिवूड-टॉलिवूडमध्ये फायटिंगचे स्टंटच जसे त्यांचे 'यूएसपी' बनले, तशी तुझी बोलण्याची जादू बनली. त्यामुळे तुला कधी अँक्शन करण्याची गरजच पडली नाही.
'प्यारवाली लव्हस्टोरी' सारख्या चित्रपटात स्टोरीमध्ये अनेक जागा आणि संधी असताना तुला अँक्शनचा मोह झाला नाहीच; पण दिग्दर्शकालाही पूर्ण कल्पना होती की, तू असल्यावर या सगळ्याची गरजच नाही. संपूर्ण चित्रपटभर तुझ्या संवादांचं गारुड, तुझा उत्स्फूर्त अभिनय, भारून टाकणारा वावर असल्यावर आणखी काही 'ट्रिक' वापरण्याची गरजच पडत नाही. संपूर्ण चित्रपट स्वत:च्या खांद्यावर ओढून नेणार्या मराठीतील काही मोजक्या कलाकारांत तू आहे.
अगदी 'मुंबई-पुणे-मुंबई'चे उदाहरण घेतले, तरी काय आहे या चित्रपटात. अगदी साधीशी गोष्ट; पण त्यात स्वप्निल जोशी आहे. तुझी बडबड, बडबड आणि बडबड ऐकण्यासाठी अनेकांनी हा चित्रपट अनेकदा पाहिला. 'वेलकम जिंदगी'सारखा वेगळा विषय; पण या चित्रपटाचे बळच तुझा अभिनय होते.
आत्महत्येच्या टोकापर्यंत गेलेल्यांना पुन्हा जगण्याची उमेद मिळवून देताना बोलण्यातील जी जादू पाहिजे ती स्वप्निलशिवाय दुसर्या कोणाकडे असणार?
'मितवा'मध्ये तर तू प्रेमाचे सगळे गहिरे रंग अशा पद्धतीने दाखविलेस, की खरा प्रेमिक तुझ्यामध्ये पाहू लागले.
या सगळ्या प्रवासात मराठीतील खराखुरा 'चॉकलेट हिरो' म्हणून बिरुदावली तुला आपोआपच चिकटली.
हे सगळं पाहिल्यावर तुझा प्रवास आठवतो. वयाच्या सातव्या वर्षीच तू 'स्वर्ग सात पावलांचा' नाटकातून रंगमंचावर उभा राहिलास.
'रामायण'चा कुश असा साकारलास की, कृष्णाच्या भूमिकेत तुझ्याशिवाय कोणाचा विचारच करवला नाही.