3rd Wedding Anniversary: मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण, पेशवाई थाटात पार पडले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:53 IST2019-12-03T16:41:18+5:302019-12-03T16:53:27+5:30
पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मृण्मयी आणि स्वप्नील यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते.

3rd Wedding Anniversary: मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण, पेशवाई थाटात पार पडले होते लग्न
3 डिसेंबर 2016 रोजी बिझनेसमन स्वप्निल राव याच्याशी मृण्मयी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मृण्मयीने लग्नातील एक फोटो शेअर करुन नव-याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.
''I love you to Pluto and back Rao.... We are 3 years old!! विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मृण्मयी आणि स्वप्नील यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता. आकर्षक साडीमध्ये नवराई मृण्मयीचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते.
नवरी इतकी नटून थटून तयार असताना नवरदेव स्वप्नीलसुद्धा मागे कसा राहिल. त्याने खास पेशवे स्टाईलमध्ये पगडी आणि कपडे परिधान केले होते. या लग्न सोहळ्याला मृण्मयीचे चित्रपटसृष्टीतील खास मंडळींनी हजेरी लावली होती. मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे.
मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वोत्तम आणि अनुरुप जोडी समजली जाते. दोघंही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात शिवाय दोघांचं एकमेकांशी चांगलंच पटतं.
मराठी चित्रपटसृष्टीतील ही जोडी सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना दोघं काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात.