नथीचा नखरा...अमृता खानविलकरने शेअर केलेला थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:30 IST2021-03-18T19:30:00+5:302021-03-18T19:30:02+5:30
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..

नथीचा नखरा...अमृता खानविलकरने शेअर केलेला थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने इंस्टाग्रामवर तिचा थ्रो बॅक फोटो शेअर केले आहे. नाकात नथ ब्लॉक अँड व्हाईट फोटोत अमृता खूपच सुंदर दिसतेय. अमृताने शेअर केलेला थ्रोबॅक फोटोत तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस तिच्या या फोटोवर त्यांनी केला आहे.
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही घायाळ होत असतात.
मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.