आशुतोषच्या आत्महत्येवेळी मयुरीदेखील होती घरातच, ना मतभेद, ना आर्थिक चणचण आत्महत्येमागचे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:51 IST2020-07-30T13:50:08+5:302020-07-30T13:51:15+5:30
अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

आशुतोषच्या आत्महत्येवेळी मयुरीदेखील होती घरातच, ना मतभेद, ना आर्थिक चणचण आत्महत्येमागचे कारण काय?
अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. आशुतोष भाकरेने नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोषने डिप्रेशनमुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आशुतोष भाकरेने 29 जुलैला सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची माहिती कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी दिली. आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असे त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. सध्या मयुरीही नांदेडमध्येच असल्याचे समजते आहे. त्या दोघांमध्ये कोणतेही वाद नव्हते आणि आर्थिक चणचणदेखील नव्हती तरीदेखील आशुतोषने आत्महत्या का केली, असा प्रश्न त्याच्या जवळच्या व्यक्तींना पडला आहे.
नांदेडमधील गणेश नगर येथील घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला.
आशुतोष भाकरेने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘जुन-जुलै’ या बहुचर्चित नाटकाची निर्माती त्याने केली.