'टाइमपास' फेम प्रथमेश परबचा केळवणातला हटके उखाणा चर्चेत, म्हणतो - "क्षितीजा लय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:16 AM2024-01-17T09:16:01+5:302024-01-17T09:16:29+5:30
Prathamesh Parab : 'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील पराजूबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. नुकतीच त्याच्या केळवणाला सुरूवात झाली आहे.
'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील पराजूबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. नुकतीच त्याच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. केळवणाचे फोटो शेअर करून क्षितीजाने लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. आता पुन्हा क्षितीजाने फोटो शेअर करत साखरपुड्याची तारीख सांगितली आहे. दरम्यान आता प्रथमेश परबचा एका केळवणातील उखाणा चर्चेत आला आहे.
टाइमपास सिनेमातील दगडूच्या भूमिकेतून अभिनेता प्रथमेश परब घराघरात पोहचला. त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. प्रथमेश गर्लफ्रेंड क्षितीजासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच इट्स मज्जाने त्यांचे केळवण केले. त्यावेळी प्रथमेशने हटका उखाणा घेतला आहे. यावेळी त्याने उखाण्यात टाइमपास आणि टाइमपास २ चित्रपटातील त्याच्या नायिकांची नावं घेतली आहेत. त्याने उखाणा घेताना म्हटले की, ''दगडूची होती काजू कतली आणि पराजू पतली, आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, क्षितीजा लय मेहनतीने पटली''. त्याचा हा उखाणा चांगलाच चर्चेत आला आहे.
प्रथमेश आणि क्षितीजासाठी १४ फेब्रुवारी आहे खास
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांचा १४ फेब्रुवारी रोजी साखरपुडा पार पडणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. मात्र सध्या त्यांचे जोरदार केळवण सुरू आहे. क्षितीजाने त्यांच्या एंगेजमेंटच्या तारखेबद्दल सांगताना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दलही सांगितले होते. ती म्हणाली की, १४ फेब्रुवारी २०२०- माझी व्हॅलेंटाइन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. १४ फेब्रुवारी, २०२१ मध्ये आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. १४ फेब्रुवारी, २०२२ अनेक आठवणींसह रिलेशनशीपला एक वर्ष पूर्ण झालं. १४ फेब्रुवारी २०२३ आमच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर अनाऊंस केलं. १४ फेब्रुवारी २०२४ला आमच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. मग आता काहीतरी स्पेशल केलेच पाहिजे ना!!"