तनिष्ठा चॅटर्जी डॉ. रखमाबाईंच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2016 11:09 AM2016-10-06T11:09:05+5:302016-10-06T16:39:05+5:30
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. डॉ. रखमाबाई सिनेमाच्या ...
ब लिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. डॉ. रखमाबाई सिनेमाच्या माध्यमातून तनिष्ठा चॅटर्जी रसिकांच्या भेटीला येणार आहे. पहिली स्त्री वैद्य “डॉ. रखमाबाई” यांची भूमिका तनिष्ठा रूपेरी पडद्यावर साकारणार असून डॅा.रखबाई यांचा जीवनप्रवास या सिनेमातून उलगडण्यात येणार आहे. अनंत महादेवन सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून डॉ.स्वप्ना पाटकर सिनेमाची निर्मिती करणार आहेत. आजही स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, बालविवाह यांसारख्या विविध प्रश्नांवर सिनेमातून भाष्य करण्यात येणार आहे.