आज ‘गोवा मराठी चित्रपट फेस्टिव्हलमध्ये’ १७ चित्रपटांचे स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2016 07:08 AM2016-06-04T07:08:18+5:302016-06-04T12:38:18+5:30
‘नवव्या गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आणि उद्घाटनानंतर संजय लीला भंसाळी यांचा ...
वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट दाखवणार-या या चित्रपट महोत्सवात आज ४ जून रोजी १७ चित्रपटांचे स्क्रिनिंग दाखवण्यात येणार आहे. कला अकादमी, आयनॉक्स, मॅकनिझ पॅलेस याठिकाणी चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे.
कला अकादमी येथे सैराट (सकाळी १० वाजता), पिंडदान (दुपारी १:३० वाजता), दमलेल्या बाबाची कहानी (सायंकाळी ४ वाजता), डॉट कॉम मॉम (प्रिमिअर) (सायंकाळी ६:४५ वाजता) दाखवण्यात येणार आहे.
आयनॉक्स येथे नटसम्राट (सकाळी 9:१५ वाजता), हलाल (दुपारी १२:३० वाजता), कौल(दुपारी ३ वाजता), रिंगण (सायंकाळी ५:३० वाजता), परतू (रात्री 8 वाजता) दाखवण्यात येणार आहे.
मॅकनिझ पॅलेस १ येथे कट्यार काळजात घुसली (सकाळी 9:३० वाजता), एनिमी (कोंकणी) (१२:४५ वाजता), राजवाजे अँड सन्स (दुपारी ३ वाजता) आणि वक्रतुंड महाकाय (सायंकाळी ५:३५ वाजता) दाखवण्यात येणार आहे.
मॅकनिझ पॅलेस २ येथे रंगा पतंगा (सकाळी 9:४५ वाजता), कोती(दुपारी १२ वाजता), भोभो(दुपारी २:३० वाजता), उदाहरणार्थ नेमाडे (सायंकाळी ४:४५ वाजता) दाखवण्यात येणार आहे.
गोवेकरांसाठी चित्रपटांची मेजवाणी ‘गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’ने ठेवली आहे. या मेजवाणीचा गोवेकर नक्कीच आनंद लुटतील. या महोत्सवामुळे अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होते.