या मराठी सिनेमाच्यामाध्यमातून मिळणार रोमँटीक गाण्यांची ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 09:30 AM2017-11-09T09:30:01+5:302017-11-09T15:00:01+5:30

रोमँटीक गाणी पाहणे म्हणजे प्रेक्षकांना मस्तच मेजवानी असते. प्रेक्षकांना आवडेल असंच रोमँटीक गाणं करण्याचा निर्माते आणि दिग्दर्शक यांचा नेहमी ...

Traditional songs of romantic songs will be available in the medium of Marathi cinema | या मराठी सिनेमाच्यामाध्यमातून मिळणार रोमँटीक गाण्यांची ट्रीट

या मराठी सिनेमाच्यामाध्यमातून मिळणार रोमँटीक गाण्यांची ट्रीट

googlenewsNext
मँटीक गाणी पाहणे म्हणजे प्रेक्षकांना मस्तच मेजवानी असते. प्रेक्षकांना आवडेल असंच रोमँटीक गाणं करण्याचा निर्माते आणि दिग्दर्शक यांचा नेहमी प्रयत्न असतो. यात त्यांना कधी कधी यश मिळते देखील. नायक आणि नायिकेच्या या रोमँटीक गाण्यासाठी सर्वच उत्सुक असतात, जसे पाहणारे उत्सुक असतात तसेच त्यात काम करणारे देखील उत्सुक असतात. असाच एक गमतीशीर किस्सा माझा एल्गार या सिनेमाच्या रोमँटीक गाण्याच्या चित्रीकरणावेळी घडला.

मिलिंद कांबळे दिग्दर्शित माझा एल्गार सिनेमात यश कदम आणि ऐश्वर्या राजेश हे नायक आणि नायिकेच्या भूमिकेत आहेत. यश, या रोमँटीक गाण्याचा किस्स्या बद्दल सांगतो कि, तुम्हाला प्रेक्षक म्हणून असे रोमँटीक गाणं पाहतांना मज्जाच येते, पण आम्हाला कलाकार म्हणून करतांना खूप दडपण असते. नायिकेला समुद्रकिनारी मस्त सायंकाळी बाहुपाशात घेतांना पाहणं तुम्हाला आनंददायी वाटत असेल हो, पण माझ्यासारखा पहिल्यांदाच असे रोमँटीक गाणं करणारा अभिनेता सॉलिड दडपणात असतो. माझा एल्गार सिनेमाचे असेच एक रोमँटीक गाणं आम्ही चित्रित करत होतो. जेव्हा दिग्दर्शकाने सांगितले तेव्हा छान वाटलं पण चित्रिकरणाच्या वेळी समुद्रकिनारी अनवाणी चालतांना उन्हाचे चटके बसत होते. अशात चेहऱ्यावर रोमँटीक भाव दाखवणे म्हणजे खऱ्या अर्थाने अभिनय करावा लागत होता. चेहऱ्यावर खूप घाम आला होता, समुद्राच्या पाण्यात नायिका ऐश्वर्याला उचलून, बाहुपाशात घेऊन, गोल गोल फिरवायचे होते. एक तर समोर सगळे शुटींगची माणसं आपल्याकडे एकटक बघत असतात. त्यात अनेकदा रिटेक होतात...सगळा मूड पुन्हा आणावा लागतो. कसा बसा अखेर हा सीन चित्रित झाला, परंतु मी जेव्हा ऐश्वर्याला उचलून गोल गोल फिरवत होतो तेव्हा ती काहीतरी सांगत होती, अर्थात ती ओरडतच होती, पण मला वाटले कि हा देखील सीनचा भाग असेल, मी लक्ष दिले नाही, मला सीन लवकर संपवायचा होता. नंतर मला सगळ्यांनी सांगितले कि, ती आणि आम्ही सर्व तुला सांगायचा प्रयत्न करत होतो कि, तिची हिल्स तुटली आहे. पण मी काही केल्या ऐकत नव्हतो..असं एकदा नाही तर चार पाच वेळा झालं..आजही त्या क्षणाची आठवण झाली तर आम्ही सर्व हसत असतो.
यश कदम, आपल्या भूमिकेबद्दल सांगतो कि, जसा सिनेमात मुक्ताचा प्रवास आहे तसाच माझा म्हणजे मनोजचा देखील प्रवास आहे. एका व्यक्तीला समोर ठेऊन मी ही भूमिका केली आहे. अर्थात एक चौकट होतीच त्यात राहूनच मला ही भूमिका करायची होती. हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. जेव्हा आता १० नोव्हेंबरला तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, कि ती व्यक्ती कोण आहे ते. त्यासाठी तुम्हाला माझा एल्गार सिनेमा बघावा लागेल.

Web Title: Traditional songs of romantic songs will be available in the medium of Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.